Ladki Bahin Yojana Recovery: लाडक्या बहिणींना मोठा झटका: …तर आता थेट तुमच्या घरी येणार पोलीस! पुरुषांनीही चुकीच्या पद्धतीने पैसे घेतल्याचे उघड

Ladki Bahin Yojana Recovery: नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत एक खळबळजनक आणि मोठी अपडेट समोर आली आहे. योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांवर आता सरकार अत्यंत कठोर कारवाई करणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘साम टीव्ही’शी विशेष संवाद साधताना स्पष्ट केले की, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचे पैसे लाटले आहेत, त्यांच्याकडून थेट रक्कम वसूल केली जाणार आहे. या घोषणेमुळे बोगस लाभार्थ्यांचे धाबे पुरते दणाणले आहेत.

पुरुष लाभार्थ्यांकडूनही होणार पैशांची वसुली! Ladki Bahin Yojana Recovery

या योजनेच्या पडताळणी दरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. केवळ अपात्र महिलाच नाही, तर काही पुरुषांनीही बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे! यावर कडक भूमिका घेत मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “पात्र लाभार्थी कोणत्याही परिस्थितीत योजनेपासून वंचित राहू नयेत हाच आमचा प्रयत्न आहे. परंतु, ज्या पुरुषांनी आणि अपात्र व्यक्तींनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे, त्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जाईल.” Ladki Bahin Yojana Recovery

📝 ही माहिती सुद्धा पहा: Why Ladki Bahin Yojana money is not credited: लाडकी बहीण योजना: तुमचा हप्ता का रखडला? पैसे बंद होण्यामागची ‘ही’ आहेत ७ मुख्य कारणे; आज सोमवारपासून पुन्हा सुरू होणार वितरण!

ई-केवायसी (e-KYC) न करणाऱ्यांची चौकशी सुरू

मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत संपल्यानंतरही राज्यातील लाखो महिलांनी केवायसी केलेली नाही. या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी आता प्रत्येक विभागाकडून सविस्तर डेटा मागवण्यात आला असून, या सर्व संशयास्पद खात्यांची सखोल तपासणी केली जात आहे. Ladki Bahin Yojana Recovery

अपात्र ठरलेल्या ‘या’ महिलांना पुन्हा मिळणार दिलासा!

कारवाईचा बडगा उगारला जात असतानाच, काही महिलांना मात्र आदिती तटकरे यांनी मोठा दिलासा दिला आहे. ज्या पात्र महिला आरटीओच्या (RTO) चुकीच्या डेटामुळे अपात्र ठरल्या होत्या, त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे. जर एखाद्या महिलेच्या नावावर प्रत्यक्षात चारचाकी वाहन नाही, परंतु तरीही आरटीओ लिस्टमध्ये नाव आल्यामुळे हप्ता बंद झाला असेल, तर त्यांनी आवश्यक पुरावे सादर करावेत. अशा प्रकरणांची पुन्हा पडताळणी करून त्यांचा हप्ता तात्काळ सुरू केला जाईल.

📝 ही माहिती सुद्धा पहा: HSRP Plate Last Date: वाहनधारकांनो सावधान! १ जुलैपासून ‘HSRP’ नंबर प्लेट अनिवार्य; नियम मोडल्यास होणार १००० रुपये दंड, वाचा काय आहे अंतिम तारीख

लाडकी बहीण योजनेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल आवश्यक होते. Ladki Bahin Yojana Recovery पुरुषांनी आणि बोगस महिलांनी लाटलेला निधी वसूल केल्यामुळे खऱ्या गरजू आणि गरीब भगिनींना वेळेवर आर्थिक मदत मिळणे अधिक सोपे होणार आहे. जर तुमचे कनेक्शन कायदेशीर असेल आणि आरटीओच्या चुकीच्या नोंदीमुळे पैसे थांबले असतील, तर घाबरण्याचे कारण नाही; आवश्यक कागदपत्रे सादर करून तुम्ही तुमचा हक्क पुन्हा मिळवू शकता.

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi