HSRP Plate Last Date: वाहनधारकांनो सावधान! १ जुलैपासून ‘HSRP’ नंबर प्लेट अनिवार्य; नियम मोडल्यास होणार १००० रुपये दंड, वाचा काय आहे अंतिम तारीख

HSRP Plate Last Date: नमस्कार मंडळी, सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांसाठी पुणे महानगरपालिका आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) एक अत्यंत महत्त्वाची आणि कडक कायदेशीर चेतावणी जारी केली आहे. वाहनांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शासनाने ‘एचएसआरपी’ (High-Security Registration Plate – HSRP) म्हणजेच ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट’ लावणे बंधनकारक केले आहे. ही प्लेट न लावणाऱ्या वाहनधारकांवर आता थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

१ जुलैपासून नियम अनिवार्य! HSRP Plate Last Date

पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत पत्रकानुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना १ जुलै २०२६ पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी)-HSRP Plate Last Date लावणे पूर्णपणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुमच्या वाहनाची नोंदणी १ एप्रिल २०१९ पूर्वीची असेल आणि तुम्ही अजूनही जुनी नंबर प्लेट वापरत असाल, तर तुम्हाला ती तातडीने बदलून घ्यावी लागणार आहे.

📝 ही माहिती सुद्धा पहा: Maharashtra Farmer Loan Waiver Scheme 30 June: राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! अखेर कर्जमाफीची तारीख ठरली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा

३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

नागरिकांना ही प्लेट लावून घेण्यासाठी प्रशासनाने ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. या मुदतीमध्ये वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर एचएसआरपी प्लेट बसवून घेणे आवश्यक आहे. ३० जून ही शेवटची तारीख HSRP Plate Last Date असून, त्यानंतर कोणतीही नवीन मुदतवाढ दिली जाणार नाही, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

नियम मोडल्यास १००० रुपये दंड!

दिलेल्या मुदतीत म्हणजेच ३० जून २०२६ पर्यंत जर वाहनाला एचएसआरपी प्लेट लावली नाही, तर १ जुलै २०२६ पासून वाहतूक पोलिसांकडून किंवा आरटीओ प्रशासनाकडून थेट कारवाई केली जाईल. नियमाचा भंग केल्यास वाहनधारकाला १,००० रुपये इतका मोठा दंड ठोठावला जाणार आहे. त्यामुळे होणारा आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप टाळण्यासाठी वेळेत ही प्लेट बसवणे अत्यंत गरजेचे आहे. HSRP Plate Last Date

वाहनांची चोरी रोखण्यासाठी आणि सर्व वाहनांचा डेटा डिजिटल करण्यासाठी एचएसआरपी प्लेट अत्यंत महत्त्वाची आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. नवल किशोर राम आणि महापौर मा. सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय अधिक प्रभावीपणे राबवला जात आहे. तुम्ही अद्याप ऑनलाईन बुकिंग केले नसेल, तर आजच अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या वाहनाची ‘एचएसआरपी’ प्लेट बुक करा आणि १ जुलै रोजी होणाऱ्या दंडात्मक कारवाईपासून स्वतःला वाचवा.

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi