Karjmukti Grievance Process 2026: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारची ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ Karjmukti Grievance Process 2026अत्यंत दिलासादायक ठरत आहे. मात्र, कर्जमाफीच्या प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांच्या नावात, आधार कार्डमध्ये, गट क्रमांकामध्ये किंवा बँक खात्याच्या तपशिलात चुका असल्यामुळे अथवा मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नावे न आल्यामुळे लाभार्थी अडचणीत आले आहेत. या सर्वांवर तोडगा काढण्यासाठी शासनाने ‘कर्जमाफी तक्रार (Grievance) नोंदवण्याची’ विशेष ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
जर तुमच्या कर्जमाफीच्या माहितीत काही त्रुटी असतील, तर घाबरण्याचे कारण नाही. योग्य Grievance पर्याय निवडून तक्रार कशी नोंदवायची आणि तहसील कार्यालयात कोणती कागदपत्रे जमा करायची, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. Karjmukti Grievance Process 2026
📝 ही माहिती सुद्धा पहा: EPFO UAN Activation New Rules 2026: पीएफ धारकांना मोठा झटका! EPFO चा सर्वात मोठा बदल; UAN Activation ची जुनी वेबसाईट पद्धत बंद, आता ‘या’ ॲपवर चेहरा दाखवणे बंधनकारक!
३ मुख्य टप्प्यांत तक्रार (Grievance) नोंदवण्याची पद्धत Karjmukti Grievance Process 2026
१. पहिली पायरी (माहिती शोधणे): सर्वप्रथम पोर्टलवर जाऊन लाभार्थ्याचा क्रमांक टाकून संपूर्ण माहिती Search करा. स्क्रीनवर दिसणारे नाव, आधार माहिती, गट क्रमांक, बँक खाते व मिळणाऱ्या मदतीची रक्कम काळजीपूर्वक तपासा. जर सर्व माहिती बरोबर असेल पण केवळ आधार प्रमाणीकरण होत नसेल, तर “Unable to Authenticate, Agree with All” हा पर्याय निवडा.
📝 ही माहिती सुद्धा पहा: CPSE IDA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात (DA) मोठी वाढ जाहीर; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
२. दुसरी पायरी (कायदेशीर वारसाच्या प्रकरणात): जर मूळ शेतकरी मयत असेल, तर संबंधित कायदेशीर वारसाचा आधार क्रमांक टाकून सिस्टीमवर Grievance नोंदवावा.
३. तीसरी पायरी (पावती व तहसील भेट): तक्रार यशस्वीरीत्या Submit केल्यानंतर मिळणारी अधिकृत पावती (Receipt) Print करून घ्या. ही पावती संबंधित शेतकरी किंवा कायदेशीर वारसाला देऊन आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयात जमा करण्याचा सल्ला द्यावा.
योग्य Grievance पर्याय कधी आणि कोणता निवडावा?
शेतकऱ्यांनी चुकीचा पर्याय निवडल्यास तक्रार प्रलंबित राहू शकते. त्यामुळे खालील तक्ता पाहूनच योग्य पर्याय निवडा.
| सिस्टीमवर दिसणारा Grievance पर्याय | पर्याय निवडण्याचे अचूक कारण / अर्थ |
| Unable to Authenticate, Agree with All | आधार प्रमाणीकरण (Biometric) होत नाही; पण स्क्रीनवरील सर्व माहिती पूर्णपणे बरोबर आहे. |
| Disagree Aadhaar | नोंदवलेला आधार क्रमांक चुकीचा असल्यास. |
| Disagree GAT Kramank | शेताचा गट क्रमांक चुकीचा दाखवत असल्यास. |
| Disagree Bank Details | बँकेचे नाव, खाते क्रमांक किंवा IFSC कोड चुकीचा असल्यास. |
| Disagree Name, Aadhaar, GAT & Bank | नाव, आधार, गट क्रमांक आणि बँक तपशील हे सर्वच चुकीचे असल्यास. |
| Disagree Name & Aadhaar | फक्त नाव आणि आधार क्रमांक चुकीचा असल्यास. |
| Disagree Name | फक्त शेतकाऱ्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक असल्यास. |