BMC Rajawadi Hospital Recruitment 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात परिचारिका व तंत्रज्ञ पदांची भरती

BMC Rajawadi Hospital Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC / MCGM) वैद्यकीय विभागात नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील घाटकोपर येथील प्रसिद्ध ‘राजावाडी रुग्णालयात’ (Rajawadi Hospital) कंत्राटी (Contractual) तत्त्वावर परिचारिका (Staff Nurse) आणि क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technician) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि ऑफलाईन अर्जाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण १७ जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने (Offline) अर्ज मागविण्यात येत आहेत. लक्षात ठेवा, ०९ सप्टेंबर २०२६ ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहेBMC Rajawadi Hospital Recruitment 2026

📝 ही भारती सुद्धा पहा: Bombay High Court Recruitment 2026: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्वयंपाकी पदांच्या १८ जागांसाठी भरती जाहीर; चौथी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!

💡 महत्त्वाची सूचना: उमेदवारांनी आपला संपूर्ण अर्ज कोणताही गोंधळ किंवा चूक न करता व्यवस्थित भरण्यासाठी आणि दिलेल्या पत्त्यावर पाठवण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती अतिशय काळजीपूर्वक वाचावी.

भरतीचा तपशील आणि एकूण रिक्त जागा (BMC Vacancy Details)

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (MCGM) घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाच्या आस्थापनेवर वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

पदाचे नाव आणि रिक्त जागा (Post Details) BMC Rajawadi Hospital Recruitment 2026

या भरती अंतर्गत एकूण १७ पदे भरली जाणार आहेत, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे:

१. परिचारिका (Staff Nurse): १६ पदे

२. क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technician): ०१ पद (एकूण रिक्त जागा: १७ पदे)

शैक्षणिक पात्रता, अनुभव व वयाची अट (Eligibility Criteria)

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील शैक्षणिक पात्रता, तांत्रिक प्रमाणपत्रे आणि वयोमर्यादा तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे. BMC Rajawadi Hospital Recruitment 2026

आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव (Educational Qualification)

  • १. परिचारिका (Staff Nurse): उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. तसेच जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी (GNM) डिप्लोमा (किंवा ३.५ वर्षांचा कोर्स) पूर्ण केलेला असावा. संगणक पात्रता: उमेदवाराकडे MS-CIT किंवा DOEACC चे CCC/O/A/B/C लेव्हल प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.

📝 ही भारती सुद्धा पहा: South Indian Bank Recruitment 2026: साउथ इंडियन बँकेत ज्युनियर ऑफिसर पदांची भरती जाहीर; पदवीधरांना बँकेत नोकरीची मोठी संधी!

  • २. क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technician): उमेदवार १२ वी (मराठी विषयासह) उत्तीर्ण असावा. तसेच BPMT (Radiology) कोर्स आणि ६ महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी (प्रथम प्राधान्य) किंवा विज्ञानातील पदवी (B.Sc) + रेडिओग्राफी डिप्लोमा + ०१ वर्षाचा अनुभव (द्वितीय प्राधान्य) किंवा १२ वी विज्ञान + रेडिओग्राफी डिप्लोमा + ०२ वर्षांचा अनुभव (तृतीय प्राधान्य). संगणक पात्रता: MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र आवश्यक.

वयोमर्यादा (Age Limit)

  • उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे.

  • वयातील सूट: मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षांपर्यंत असेल.

वेतन/मानधन आणि अर्ज शुल्क (Salary & Application Fee)

  • वेतन (Salary):

    • परिचारिका (Staff Nurse): रु. ३०,०००/- प्रति महिना.

    • क्ष-किरण तंत्रज्ञ: रु. २०,०००/- प्रति महिना.

  • अर्ज शुल्क (Application Fee): ₹१,०२७/- (ज्यामध्ये ₹८७० अधिक १८% GST ₹१५७ समाविष्ट आहे).

  • नोकरीचे ठिकाण: मुंबई (राजावाडी रुग्णालय, घाटकोपर). BMC Rajawadi Hospital Recruitment 2026

अर्जाची पद्धत आणि महत्त्वाच्या तारखा (How to Apply Offline)

या BMC Rajawadi Hospital Recruitment 2026 वैद्यकीय भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. २४ ऑगस्ट २०२६ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारांनी आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती (Xerox) खाली दिलेल्या पत्त्यावर वेळेत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत किंवा स्वतः जाऊन जमा करावेत.

📝 ही भारती सुद्धा पहा: SBI Clerk Recruitment 2026: भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या १५३८ जागांसाठी मेगा भरती जाहीर; पदवीधरांना सुवर्णसंधी!

  • अर्ज पाठविण्याचा/सादर करण्याचा पत्ता: प्रशासकीय अधिकारी (स्थापना) यांचे कार्यालय, राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (मुंबई).

  • अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: ०९ सप्टेंबर २०२६ (सायंकाळी ०४:०० वाजेपर्यंत).

📢 एक मिनिट नक्की वाचा: अशाच प्रकारच्या आरोग्य विभाग, महानगरपालिका आणि खाजगी नोकरीच्या नवनवीन व खात्रीशीर अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) वेबसाईटला नेहमीच भेट द्या आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

  • 🔗 अधिकृत पीडीएफ (जाहिरात) पाहण्यासाठी इथे क्लिक करा (Download PDF)

  • 🔗 अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा (Official Website – mcgm.gov.in)

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) BMC Rajawadi Hospital Recruitment 2026 अखत्यारीत असलेल्या राजावाडी रुग्णालयात स्टाफ नर्स आणि एक्स-रे टेक्निशियन म्हणून काम करण्याची ही एक अत्यंत उत्तम संधी आहे. चांगला पगार आणि मुंबईतच नोकरी असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी आजच आपला अर्ज सर्व कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात सादर करावा. सर्व उमेदवारांना ‘नोकरी हक्काची’ टीमकडून हार्दिक शुभेच्छा!

BMC Rajawadi Hospital Recruitment 2026 BMC Rajawadi Hospital Recruitment 2026

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi