Ladki Bahin Yojana May Installment: नमस्कार लाडक्या बहिणींनो, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची आणि थकीत पैशांची वाट पाहणाऱ्या लाखो महिला लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाकडून अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. शासनाने नियोजित वेळापत्रकानुसार मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधी मंजुरीचा अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे. Ladki Bahin Yojana May Installment Date यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
सामाजिक न्याय विभागाकडून ३४४ कोटींचा निधी जाहीर!
१० जून २०२६ रोजी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण जीआर काढण्यात आला आहे. माहे मे २०२६ – Ladki Bahin Yojana May Installment Date या महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती (SC) घटकातील पात्र महिला लाभार्थ्यांना देण्यासाठी ३४४ कोटी ७४ लाख रुपयांच्या अवाढव्य निधीला मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ओपन (Open) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गाचा निधी यापूर्वीच वितरित करण्यात आला होता आणि आता एससी प्रवर्गाचाही निधी आल्यामुळे सर्वांचे हप्ते बँक खात्यात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
📝 ही माहिती सुद्धा पहा: Ladki Bahin Yojana Recovery: लाडक्या बहिणींना मोठा झटका: …तर आता थेट तुमच्या घरी येणार पोलीस! पुरुषांनीही चुकीच्या पद्धतीने पैसे घेतल्याचे उघड
एकाच वेळी मिळणार ३,००० ते ४,५०० रुपये! (थकीत हप्तेही मिळणार)
या निधी मंजुरीमुळे केवळ मे महिन्याचेच १५०० रुपये मिळणार नाहीत, तर ज्या पात्र महिलांचे मागील हप्ते तांत्रिक पडताळणी किंवा केवायसीमुळे प्रलंबित होते, त्यांना मोठा लॉटरी लागली आहे. Ladki Bahin Yojana May Installment Date
-
फेब्रुवारी-मार्चचे थकीत पैसे: ज्या अनुसूचित जातीच्या महिलांचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे हप्ते अडकले होते, त्यांना आता जुने पैसे आणि मे महिन्याचा हप्ता मिळून एकाच वेळी ४,५०० रुपयांपर्यंतचा मोठा लाभ मिळू शकतो.
-
एप्रिल-मे चे पैसे: ज्या महिलांचा एप्रिल महिन्याचा हप्ता बाकी आहे, त्यांच्या खात्यात दोन महिन्यांचे एकत्र मिळून थेट ३,००० रुपये क्रेडिट केले जाणार आहेत.Ladki Bahin Yojana May Installment Date
📝 ही माहिती सुद्धा पहा: Ladki Bahin Yojana Fake News: लाडकी बहीण योजना मुदतवाढ केवळ अफवा! सरकारने जारी केला ‘फेक न्यूज अलर्ट’; महिलांनी ‘या’ गोष्टीवर विश्वास ठेवू नये
आता दर महिन्याला ‘या’ तारखेला येणार पैसे | Ladki Bahin Yojana May Installment Date
शासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, राज्यातील लाभार्थ्यांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया आणि अंतिम पडताळणी आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे यापुढे महिलांना हप्त्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. पुढील प्रत्येक महिन्यापासून १० ते १५ तारखेच्या दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट पात्र महिलांच्या बँक खात्यात (DBT द्वारे) जमा केले जातील, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
📝 ही माहिती सुद्धा पहा: Why Ladki Bahin Yojana money is not credited: लाडकी बहीण योजना: तुमचा हप्ता का रखडला? पैसे बंद होण्यामागची ‘ही’ आहेत ७ मुख्य कारणे; आज सोमवारपासून पुन्हा सुरू होणार वितरण!
लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याचा निधी बँकेकडे वर्ग झाल्यामुळे आगामी २ ते ३ दिवसांत सर्व पात्र महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज येण्यास सुरुवात होईल. हा अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी महिला सरकारच्या gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. तुमची बँक केवायसी पूर्ण असेल, तर तुमचे थकीत पैशांसह ३,००० ते ४,५०० रुपये थेट खात्यात जमा होणार हे आता निश्चित झाले आहे.