EPFO 3.0 Universal Pension Scheme: प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांनाही मिळणार पेन्शनचे गिफ्ट! EPFO 3.0 मध्ये सरकारचा असा आहे सरकारचा ‘मास्टर प्लॅन’.

EPFO 3.0 Universal Pension Scheme: नमस्कार मंडळी, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता खाजगी क्षेत्रातील (Private Sector) कर्मचारी, गिग वर्क्स आणि लहान व्यावसायिकांनाही वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा हक्काची पेन्शन मिळण्याची मोठी बातमी समोर येत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ‘EPFO 3.0’ अंतर्गत एका युनिव्हर्सल पेन्शन योजनेवर (Universal Pension Scheme) वेगाने काम करत असून, या संदर्भातील एक मोठा मसुदा विचाराधीन आहे.

या EPFO 3.0 Universal Pension Scheme योजनेमुळे केवळ संघटित क्षेत्रातील कर्मचारीच नाही, तर देशातील कोट्यवधी असंसंघटित कामगार, फ्रीलान्सर आणि स्वयंरोजगार असणाऱ्या नागरिकांना सामाजिक सुरक्षेचे (Social Security) मोठे कवच मिळणार आहे.

📝 ही माहिती सुद्धा पहा: EPFO PF Interest Credit CITES Update: सर्वात मोठी खुशखबर! १५ जुलैपर्यंत पीएफ खात्यात जमा होणार ८.२५% व्याज; EPFO ने लागू केली नवी डिजिटल प्रणाली, पाहा मोठे बदल

‘EPFO 3.0’ युनिव्हर्सल पेन्शन योजनेची मुख्य वैशिष्ट्ये | EPFO 3.0 Universal Pension Scheme

  • सर्वांचा समावेश: प्रायव्हेट कर्मचारी, गिग वर्क्स (Gig Workers), प्लॅटफॉर्म वर्कर्स, फ्रीलान्सर आणि छोटे व्यावसायिक या पेन्शन योजनेसाठी आपले पैसे जमा करू शकतील. EPFO 3.0 Universal Pension Scheme

  • दीर्घकालीन बचत व वार्षिक व्याज: ही एक कंट्रीब्युटरी पेन्शन योजना असेल. यात सदस्यांना दीर्घकाळासाठी बचत करावी लागेल, ज्यावर सरकारकडून वार्षिक व्याज दिले जाईल.

  • डिजिटल डॅशबोर्ड: सदस्यांना त्यांच्या डिजिटल डॅशबोर्डवर अंदाजित पेन्शन, जमा बचत आणि निवृत्ती फंडची (Retirement Fund) सर्व माहिती एकाच ठिकाणी थेट पाहता येईल.

  • टारगेट रिटायरमेंट सम (TRS): वयाच्या ६० व्या वर्षी जमा झालेल्या एकूण फंडाला ‘Target Retirement Sum’ मध्ये बदलण्याची सुविधा उपलब्ध असेल. EPFO 3.0 Universal Pension Scheme

📝 ही माहिती सुद्धा पहा: RBI Plastic Currency Note Launch India Plan: पैशांच्या व्यवहारात देशातील सर्वात मोठा बदल! भारतात लवकरच येणार प्लास्टिकच्या नोटा; RBI कडून जागतिक टेंडर जारी, कागदी नोटा बंद होणार?

निवृत्तीनंतर (Retirement) पेन्शन मिळवण्यासाठी २ पर्याय

६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर सदस्यांना त्यांच्या गरजेनुसार फंडातून पैसे काढण्यासाठी किंवा पेन्शन मिळवण्यासाठी २ मुख्य पर्याय दिले जातील.

पर्याय (Pension Options) कामाचे स्वरूप व मिळणारे फायदे
१. एन्युएटी प्लॅन (Annuity Plan) या पर्यायामध्ये जमा फंडाच्या आधारे दरमहा एक ठरलेली (निश्चित) पेन्शन थेट खात्यात मिळेल.
२. सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP) या पर्यायांतर्गत निवृत्तीनंतर गरजेनुसार आपल्या रिटायरमेंट फंडातून हप्तेनिहाय पैसे काढता येतील.

🤔 NPS (नॅशनल पेन्शन सिस्टीम) पेक्षा ही योजना कशी वेगळी आहे?

  • व्यापक सहभाग: NPS च्या तुलनेत या नवीन योजनेत फक्त कर्मचारी किंवा कंपनीच नाही, तर CSR फंड, NGO, आणि इतर सर्व श्रमिक घटक जोडले जाऊ शकतात. EPFO 3.0 Universal Pension Scheme

  • पैशांच्या काढण्यावर लवचिकता (Flexibility): NPS मध्ये निवृत्तीनंतर एकरकमी रक्कम एन्युटीमध्ये लॉक होते. परंतु, EPFO च्या नव्या योजनेत सदस्यांची मूळ रक्कम (Principal Amount) पूर्णपणे सुरक्षित ठेवून केवळ व्याजाची रक्कम दरमहा पेन्शन म्हणून घेण्याचा किंवा गरजेनुसार मूळ रक्कम वेळोवेळी काढण्याचा पर्याय मिळेल.

सध्या ही EPFO 3.0 Universal Pension Scheme योजना प्रस्तावित स्वरूपात असून, याबाबतची अधिकृत घोषणा सरकारकडून लवकरच होण्याची शक्यता आहे. जर हा मास्टर प्लॅन लागू झाला, तर खाजगी नोकरी करणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांची आणि असंसंघटित क्षेत्रातील कामगारांची निवृत्तीनंतरची आर्थिक चिंता पूर्णपणे दूर होईल.

Leave a Comment