Why Ladki Bahin Yojana money is not credited: लाडकी बहीण योजना: तुमचा हप्ता का रखडला? पैसे बंद होण्यामागची ‘ही’ आहेत ७ मुख्य कारणे; आज सोमवारपासून पुन्हा सुरू होणार वितरण!

Why Ladki Bahin Yojana money is not credited: नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अनेक पात्र महिलांच्या खात्यात अजूनही चालू महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने- Why Ladki Bahin Yojana money is not credited महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते. काल रविवार असल्यामुळे बँकेच्या सुट्ट्यांमुळे हे वितरणाचे काम तात्पुरते थांबलेले होते. परंतु, ज्या महिलांचा हप्ता अद्याप आलेला नाही किंवा ज्यांचा लाभ कायमचा बंद झाला आहे, त्यामागे प्रशासकीय आणि तांत्रिक कारणे समोर आली आहेत.

आज सोमवारपासून पुन्हा पैसे जमा होण्यास सुरुवात! Why Ladki Bahin Yojana money is not credited

सर्वप्रथम पात्र लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे, योजनेचे वितरण पूर्णपणे संपलेले नाही. तांत्रिक कारणांमुळे हे वितरण केवळ तात्पुरते थांबले होते. आज सोमवारपासून (१८ मे) पुन्हा एकदा हप्त्याचे वितरण वेगात सुरू होणार आहे. त्यामुळे ज्या महिला खऱ्या अर्थाने पात्र आहेत आणि ज्यांना नेहमी शेवटी हप्ता मिळतो, त्यांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही. आजपासून टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.

📝 ही माहिती सुद्धा पहा: 8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! ८ व्या वेतन आयोगात १८ हजाराचे होणार ५२,६०० रुपये? रेल्वे संघटनेचा मोठा धमाका.

‘या’ ७ कारणांमुळे हप्ता होऊ शकतो कायमचा बंद

जर तुम्ही पात्र असूनही तुमचा हप्ता अडकला असेल, तर तुम्ही खालील चुका किंवा नियमांचे उल्लंघन केले असण्याची शक्यता आहे. Why Ladki Bahin Yojana money is not credited

१. ई-केवायसी (e-KYC) अपूर्ण असणे: ज्या महिलांनी अद्यापही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचा हप्ता थेट थांबवण्यात आला आहे.

२. केवायसी मधील चुका न सुधारणे: अनेक महिलांनी केवायसी करताना ‘घरात शासकीय नोकर आहे का?’ या पर्यायावर चुकून ‘होय’ निवडले होते. पोर्टलवर दुरुस्तीची संधी मिळूनही ज्यांनी ही चूक सुधारली नाही, त्यांचा लाभ बंद झाला आहे.

३. बँक खात्याची डीबीटी (DBT) इनॅक्टिव्ह असणे: जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल किंवा ‘Payment Decline’ चा मेसेज आला असेल, तर तुमचे पैसे जमा होणार नाहीत. नुकतीच डीबीटी ऍक्टिव्ह केलेल्या महिलांनाही या हप्त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.

४. बँक खाते बदलणे: जर तुम्ही नुकतेच तुमचे बँक खाते बदलले असेल, तर या वेळेचा हप्ता थांबून तो पुढील महिन्यात एकत्रित मिळू शकतो.

📝 ही माहिती सुद्धा पहा: PM Kisan Yojana 23rd Installment Date Update: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पुढच्या महिन्यात खात्यात येणार पीएम किसानचे २००० रुपये? २३ व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर

५. वयोमर्यादा ओलांडणे: योजनेच्या नियमानुसार वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, अगदी एक दिवस जरी वय जास्त झाले, तरी ऑनलाईन प्रणालीद्वारे अशा महिला ऑटोमॅटिक अपात्र ठरत आहेत. Why Ladki Bahin Yojana money is not credited

६. चारचाकी वाहन (Four Wheeler) खरेदी करणे: जर लाभार्थ्यांच्या कुटुंबाने नुकतीच एखादी चारचाकी गाडी खरेदी केली असेल, तर नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे त्यांचा हप्ता बंद होणार आहे.

७. इन्कम टॅक्स (ITR) भरणे: कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कर्ज घेण्यासाठी किंवा इतर कारणासाठी आयटीआर (Income Tax Return) फाईल केला असल्यास, ती महिला योजनेतून बाद होते.

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यात तांत्रिक अचूकता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. काल रविवारची सुट्टी संपल्यामुळे आज सोमवारपासून पात्र महिलांच्या खात्यात पुन्हा पैसे येण्यास-Why Ladki Bahin Yojana money is not credited सुरुवात होत आहे. जर तुम्ही वरील ७ पैकी कोणत्याही निकषात चुकत नसाल, तर तुमची पडताळणी पूर्ण होताच तुमच्या खात्यात हक्काचे पैसे जमा होतील.

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi