Agristack Farmer ID Online: शेतकऱ्यांनो सावधान! ३० जूनपूर्वी ‘हे’ काम न केल्यास कर्जमाफी, पीएम किसान आणि सर्व सरकारी अनुदान कायमचे होणार बंद; कृषी विभागाचा शेवटचा इशारा!

Agristack Farmer ID Online: नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाकडून अत्यंत महत्त्वाची आणि एक प्रकारे निर्वाणीची चेतावणी जारी करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या २० एप्रिल २०२५ च्या अधिकृत शासन निर्णयानुसार (GR), जर शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत आपले एक महत्त्वाचे काम पूर्ण केले नाही, तर ते सर्व प्रकारच्या सरकारी योजना आणि अनुदानापासून पूर्णपणे वंचित राहणार आहेत. यामध्ये पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, पीक विमा, कर्जमाफी आणि नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई या सर्व योजनांचा समावेश आहे.

३० जून २०२६ ही अंतिम तारीख! Agristack Farmer ID Online

देशभर आणि राज्यात राबविल्या जाणाऱ्या ‘ॲग्रीस्टॅक’ (Agristack) योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःचा ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) जनरेट करणे पूर्णपणे बंधनकारक करण्यात आले आहे. कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, ३० जून २०२६ ही फार्मर आयडी काढण्याची अंतिम तारीख आहे. अनेक वेळा मुदतवाढ देऊनही अजूनही लाखो शेतकऱ्यांनी ही नोंदणी केलेली नाही. आता यापुढे कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याने, ३० जूननंतर ज्यांचा फार्मर आयडी नसेल, त्यांचे सर्व शासकीय लाभ आपोआप बंद केले जातील.

लाखो शेतकरी अजूनही वंचित (धक्कादायक आकडेवारी)

राज्यातील नोंदणीची आकडेवारी पाहिल्यास एक मोठी चिंताजनक बाब समोर आली आहे.

  • एकूण खातेदार: महाराष्ट्रात सुमारे १ कोटी ७१ लाख खातेदार आहेत, ज्यांपैकी फक्त १ कोटी ३३ लाख शेतकऱ्यांनीच फार्मर आयडी काढला आहे. Agristack Farmer ID Online

  • पीएम किसान लाभार्थी: राज्यात ९१ लाख १७ हजार ॲक्टिव्ह लाभार्थ्यांपैकी तब्बल ११ लाख शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आयडी जनरेट केलेला नाही.

  • वनपट्टाधारक शेतकरी: राज्यात लाखाच्या वर वनपट्टाधारक शेतकरी आहेत, मात्र केवळ ८ ते ९ हजार शेतकऱ्यांनीच ही नोंदणी पूर्ण केली आहे.

‘या’ सर्व योजनांचे पैसे थेट होणार बंद

शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, आता मिळणारे सर्व लाभ हे केवळ आणि केवळ तुमच्या फार्मर आयडीच्या आधारेच दिले जाणार आहेत. जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर, Agristack Farmer ID Online

१. पीएम किसान व नमो शेतकरी योजना: पुढील हप्ते खात्यात जमा होणार नाहीत.

२. शेतकरी कर्जमाफी: ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’चा लाभ मिळण्यात अडचणी येतील.

३. कृषी योजना व नुकसान भरपाई: ट्रॅक्टर, ठिबक सिंचन यांसारख्या योजनांचे अनुदान आणि पीक विम्याचे पैसे रोखले जातील.

घरबसल्या मोबाईलवर कसा काढायचा फार्मर आयडी?

हा आयडी काढण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. शेतकरी आपल्या गावा किंवा शहरातून घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने स्वतःचा फार्मर आयडी जनरेट करू शकतात. जर स्वतः ऑनलाईन करणे शक्य नसेल, तर तात्काळ जवळच्या सीएससी (CSC) सेंटर किंवा महा-ई-सेवा केंद्राला भेट देऊन आपली नोंदणी ३० जूनपूर्वी निश्चित करा.

शेतकरी बांधवांनो, आता कोणतीही हलगर्जी करू नका. सरकारने दिलेली ही शेवटची संधी आहे. ३० जूननंतर कोणत्याही सरकारी योजनेचा अर्ज किंवा जुन्या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी हा फार्मर आयडी अनिवार्य असणार आहे. त्यामुळे होणारा मोठा आर्थिक फटका टाळण्यासाठी आजच आपला ‘ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी’ सुरक्षितपणे जनरेट करून घ्या. Agristack Farmer ID Online

Leave a Comment