CRPF Constable Recruitment 2026: केंद्रीय राखीव पोलीस दलात ९,१९५ जागांसाठी महाभरती; १० वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!

CRPF Constable Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही देशसेवेचे स्वप्न पाहत असाल आणि संरक्षण दलात नोकरी मिळवण्याची तुमची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) २०२६ सालासाठी एकूण ९,१९५ रिक्त पदांची मेगाभरती जाहीर केली आहे. यामध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन, टेक्निकल आणि पायोनियर विंग) अशा विविध पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२६ ही आहे.

CRPF – CRPF Constable Recruitment 2026 हे भारतातील सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. या दलात सहभागी होणे हे केवळ रोजगाराचे साधन नसून देशाची सुरक्षा करण्याची एक गौरवास्पद संधी आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रामुख्याने १० वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी असून, यामध्ये ड्रायव्हर, मेकॅनिक, मेसन, इलेक्ट्रिशियन अशा अनेक ट्रेडसाठी जागा उपलब्ध आहेत. या भरतीमुळे संपूर्ण भारतातील तरुणांना रोजगाराची एक मोठी कवाडे उघडली गेली आहेत.

या मेगाभरतीची सविस्तर माहिती, शारीरिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाणे दिली आहे.

भरतीचा तपशील Details of CRPF Constable Recruitment 2026

  • पदाचे नाव व पदसंख्या: * कॉन्स्टेबल (ट्रेड्समन आणि टेक्निकल): ९,१७५ पदे

    • कॉन्स्टेबल (पायोनियर विंग): २० पदे

  • एकूण रिक्त पदे: ९,१९५ जागा.

📝 ही भारती सुद्धा पहा: BPCL Recruitment 2026: भारत पेट्रोलियममध्ये २५० जागांसाठी मोठी भरती; पदवीधर आणि डिप्लोमा धारकांना सुवर्णसंधी!

  • शैक्षणिक पात्रता: * कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): १० वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना (HMV License).

    • कॉन्स्टेबल (मेकॅनिक मोटर व्हेईकल): १० वी उत्तीर्ण + ITI (MMV) + १ वर्ष अनुभव.

    • कॉन्स्टेबल (पायोनियर विंग): १० वी उत्तीर्ण + मेसनरी किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये १ वर्ष अनुभव.

    • उर्वरित ट्रेड: फक्त १० वी उत्तीर्ण.

  • शारीरिक पात्रता (पुरुष): * उंची: General/OBC – १७० सें.मी., ST – १६२.५ सें.मी.

    • छाती: General/OBC – ८०-८५ सें.मी., ST – ७६-८१ सें.मी.

  • शारीरिक पात्रता (महिला): * उंची: General/OBC – १५७ सें.मी., ST – १५० सें.मी.

  • वयोमर्यादा (०१ जानेवारी २०२६ रोजी): (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)

    • कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): २१ ते २७ वर्षे.

    • उर्वरित सर्व ट्रेड: १८ ते २३ वर्षे.

  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.

  • परीक्षा शुल्क: * General/OBC/EWS: ₹१००/-

    • (SC/ST/ExSM आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही).

  • अर्जाची पद्धत: या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२६ ही आहे. CRPF Constable Recruitment 2026

📝 ही भारती सुद्धा पहा:  MMRDA Recruitment 2026: मुंबईत मोठ्या पदावर नोकरीची संधी! MMRDA अंतर्गत ‘संचालक’ पदांची भरती; पगार २ लाखांच्या पार!

अर्ज कसा करायचा? (How to Apply Guide)

१. सर्वात आधी CRPF Constable Recruitment 2026 च्या अधिकृत भरती पोर्टलला किंवा खाली दिलेल्या ‘Apply Online’ लिंकला भेट द्या.

२. ‘New Registration’ वर क्लिक करून तुमची मूलभूत माहिती भरा आणि नोंदणी पूर्ण करा.

३. नोंदणीकृत आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.

४. तुम्हाला ज्या ट्रेडसाठी अर्ज करायचा आहे, तो निवडा आणि वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूक भरा.

५. फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे (उदा. १० वी मार्कशीट, ड्रायव्हिंग लायसन्स) स्कॅन करून अपलोड करा.

६. ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

मोबाईलवरून अर्ज करण्याची सुविधा

मित्रांनो, ९ हजारांहून अधिक जागांची ही मोठी भरती असून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा हा अर्ज सहज भरू शकता. फॉर्म भरताना तुमच्या मोबाईलमधील ब्राउझरमध्ये ‘Desktop View’ मोड चालू करा. यामुळे तुम्हाला अर्ज भरताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. आम्ही खात्री देतो की आमची लिंक मोबाईलवर उत्तम प्रकारे काम करेल.

अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी?

  • तुम्ही निवडलेल्या ट्रेडसाठी तुमच्याकडे आवश्यक लायसन्स किंवा अनुभव प्रमाणपत्र असल्याची खात्री करा.

  • शारीरिक पात्रतेचे निकष पूर्ण करत असाल तरच अर्ज करा. CRPF Constable Recruitment 2026

  • अर्जात फोटो आणि स्वाक्षरी स्पष्ट दिसेल याची काळजी घ्या, अन्यथा अर्ज नाकारला जाऊ शकतो.

📝 ही भारती सुद्धा पहा:  SEBI Mumbai Recruitment 2026: SEBI मुंबई अंतर्गत मोठी भरती! दरमहा ७५,००० रुपये मानधन; ‘या’ पदासाठी पदवीधरांना सुवर्णसंधी!

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi