Bank of Baroda Recruitment 2026: बँक ऑफ बडोदामध्ये २०६ जागांसाठी मेगा भरती जाहीर; पदवीधर आणि इंजिनिअर्सना सुवर्णसंधी!

Bank of Baroda Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda – BOB) अधिकारी लेव्हलवर नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदाच्या वतीने मॅनेजर, टेक्निकल ऑफिसर आणि चीफ मॅनेजर यांसारख्या विविध वरिष्ठ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठीधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहीर करण्यात आलेली आहे, Bank of Baroda Recruitment 2026 ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्जाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या मेगा भरती अंतर्गत देशभरात एकूण २०६ जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. लक्षात ठेवा, २६ ऑगस्ट २०२६ ही अर्ज करण्याची ही शेवटची तारीख आहे.

💡 महत्त्वाची सूचना: उमेदवारांनी आपला संपूर्ण अर्ज कोणताही गोंधळ किंवा चूक न करता व्यवस्थित भरण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती आणि भरतीचा तपशील अतिशय काळजीपूर्वक वाचावा.

📝 ही भारती सुद्धा पहा: CAPF Medical Officer Recruitment 2026: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात २८२ वैद्यकीय अधिकारी पदांसाठी मोठी भरती जाहीर

भरतीचा तपशील आणि एकूण रिक्त जागा (BOB Vacancy Details) Bank of Baroda Recruitment 2026

बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये आयटी, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, फायनान्स आणि सिक्युरिटी अशा विविध विभागांमध्ये उच्च पदांवर भरती केली जाणार आहे.

पदाचे नाव आणि रिक्त जागा (Post Details)

या भरती अंतर्गत एकूण २०६ पदे भरली जाणार आहेत. पदांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:

  • टेक्निकल ऑफिसर आणि मॅनेजर (सिव्हिल / इलेक्ट्रिकल): ८८ पदे

  • मॅनेजर – सिक्युरिटी (Security): ५४ पदे

  • मॅनेजर / प्रॉडक्ट मॅनेजर (डिजिटल / IT): १९ पदे

  • मॅनेजर – इन्फॉर्मेशन सिक्युरिटी: १६ पदे

  • डेटा सायंटिस्ट आणि अ‍ॅनालिस्ट (डेटा प्रोफाइलिंग/DQ/BI): १४ पदे

  • मॅनेजर – टॅक्सेशन आणि अकाउंट्स: १४ पदे

  • चीफ मॅनेजर (इन्व्हेस्टर रिलेशन्स): ०१ पद (एकूण रिक्त जागा: २०६ पदे)

📝 ही भारती सुद्धा पहा: AIIMS Nursing Officer Recruitment 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत २२१६ जागांसाठी मेगा भरती जाहीर

शैक्षणिक पात्रता व वयाची अट (Eligibility Criteria)

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी पदांनुसार खालील शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे. Bank of Baroda Recruitment 2026

आवश्यक शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

(या भरतीमध्ये विविध २२ प्रकारची पदे असल्यामुळे प्रमुख शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे वर्गीकृत केली आहे)

  • इंजिनिअरिंग (B.E/B.Tech) पदे: सिव्हिल / इलेक्ट्रिकल / कॉम्प्युटर सायन्स / IT / इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पदवी आणि संबंधित क्षेत्रात २ ते ७ वर्षांचा अनुभव.

  • सिक्युरिटी मॅनेजर: कोणत्याही शाखेतील पदवी + लष्कर, नौदल किंवा वायुदलातील ‘कमिशन्ड ऑफिसर’ (Commissioned Officer) म्हणून किमान ०५ वर्षांचा अनुभव.

  • डेटा सायन्स / IT पदे: B.Sc / M.Sc / MCA / B.E सह डेटा सायन्स / सायबर सिक्युरिटी मधील पदवी आणि ३ ते १० वर्षांचा अनुभव.

  • टॅक्सेशन / अकाउंट्स पदे: मान्यताप्राप्त संस्थेतून CA / ICWA उत्तीर्ण आणि २ ते ५ वर्षांचा अनुभव.

  • इतर पदे: अर्थशास्त्र / वाणिज्य किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि संबंधित अनुभव. (सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी खाली दिलेली अधिकृत पीडीएफ नक्की वाचा)

वयोमर्यादा आणि सूट (Age Limit)

  • ०१ ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे वय पदाच्या श्रेणीनुसार २३ ते ४३ वर्षे दरम्यान असावे.

  • वयातील सूट: मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासनाच्या नियमांनुसार वयात सूट देण्यात आली आहे (SC/ST प्रवर्ग: ०५ वर्षे सूट, OBC प्रवर्ग: ०३ वर्षे सूट). पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा, कारण २६ ऑगस्ट २०२६ ही अर्ज करण्याची ही शेवटची तारीख आहेBank of Baroda Recruitment 2026

📝 ही भारती सुद्धा पहा: BPCL Recruitment 2026: भारत पेट्रोलियममध्ये १५४ जागांसाठी मेगा भरती जाहीर; इंजिनिअरिंग डिप्लोमा धारकांना सुवर्णसंधी!

अर्ज शुल्क आणि नोकरीचे ठिकाण (Application Fee & Location)

  • खुला/ओबीसी/ईडब्ल्यूएस (General/OBC/EWS): ₹८५०/-

  • राखीव प्रवर्ग आणि महिला (SC/ST/PWD/महिला): ₹१७५/-

  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत (All India).

  • परीक्षा पद्धती: परीक्षेचा दिनांक बँक ऑफ बडोदाकडून नंतर कळविण्यात येईल.

मोबाईलवरून माहिती कशी पाहावी व ऑनलाईन अर्ज कसा करावा?

या बँक भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अनेक उमेदवारांना प्रश्न पडतो की मोबाईलवरून अर्ज कसा करायचा? तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरा सहज डाऊनलोड करू शकता. मोबाईलमध्ये सर्व पात्रता अटी व्यवस्थित वाचल्यानंतर, दिलेल्या ऑनलाईन अर्जाच्या डायरेक्ट लिंकवर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. तुमचे फोटो, स्वाक्षरी, पदवीचे प्रमाणपत्र आणि अनुभवाचे दाखले मोबाईलद्वारे स्कॅन करून अपलोड करा आणि ऑनलाईन फी भरून फॉर्म सबमिट करा. परंतु वेळेचे नियोजन करा, कारण २६ ऑगस्ट २०२६ ही अर्ज करण्याची ही शेवटची तारीख आहे.

📢 एक मिनिट नक्की वाचा: अशाच प्रकारच्या बँकिंग, शासकीय आणि खाजगी नोकरीच्या नवनवीन आणि खात्रीशीर अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) वेबसाईटला नेहमीच भेट द्या आणि तुमच्या बेरोजगार मित्रांसोबत नक्की शेअर करा.

📝 ही भारती सुद्धा पहा: RCFL MT Recruitment 2026: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये ९४ जागांसाठी मेगा भरती जाहीर

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये (BOB) उच्च पदावर काम करण्याची पदवीधर, इंजिनिअर्स आणि सीए (CA) उमेदवारांसाठी ही एक अत्यंत प्रतिष्ठेची आणि उत्तम पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे. पात्र उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी आजच आपला अर्ज ऑनलाईन सबमिट करावा. सर्व उमेदवारांना ‘नोकरी हक्काची’ टीमकडून हार्दिक शुभेच्छा!

Bank of Baroda Recruitment 2026 Bank of Baroda Recruitment 2026 Bank of Baroda Recruitment 2026

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi