BMC Shikshan Sevak Recruitment 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘शिक्षण सेवक’ पदांच्या ९३५ जागांसाठी मोठी भरती जाहीर

BMC Shikshan Sevak Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्या आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC / MCGM) BMC Shikshan Sevak Recruitment 2026 शिक्षण विभागाच्या आस्थापनेवरील ‘शिक्षण सेवक’ (Shikshan Sevak) तसेच कला आणि संगीत शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहीर करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या मेगा भरती अंतर्गत एकूण ९३५ जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांकडून शासनाच्या ‘पवित्र पोर्टल’ (Pavitra Portal) द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

💡 महत्त्वाची सूचना: उमेदवारांनी आपला संपूर्ण अर्ज कोणताही गोंधळ किंवा चूक न करता व्यवस्थित भरण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती आणि भरतीचा तपशील अतिशय काळजीपूर्वक वाचावा.

📝 ही भारती सुद्धा पहा: Bank of Baroda Recruitment 2026: बँक ऑफ बडोदामध्ये २०६ जागांसाठी मेगा भरती जाहीर; पदवीधर आणि इंजिनिअर्सना सुवर्णसंधी!

भरतीचा तपशील आणि एकूण रिक्त जागा (BMC Vacancy Details) BMC Shikshan Sevak Recruitment 2026

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये (Mumbai Public Schools) तसेच विशेष शिक्षकांसाठी ही भव्य भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

पदाचे नाव आणि रिक्त जागा (Post Details)

या भरती अंतर्गत एकूण ९३५ पदे भरली जाणार आहेत, ज्याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे: १. शिक्षण सेवक (मराठी माध्यम): ५२५ पदे २. शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम): ३५२ पदे ३. विशेष शिक्षक (चित्रकला): १० पदे ४. विशेष शिक्षक (संगीत): ४८ पदे (एकूण रिक्त जागा: ९३५ पदे)

  • वेतन/मानधन: निवड झालेल्या उमेदवारांना ‘शिक्षण सेवक’ म्हणून रु. १६,०००/- प्रतिमहिना एकत्रित मानधन दिले जाईल. BMC Shikshan Sevak Recruitment 2026

शैक्षणिक पात्रता व वयाची अट (Eligibility Criteria)

उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी पदांनुसार खालील शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

📝 ही भारती सुद्धा पहा: CAPF Medical Officer Recruitment 2026: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात २८२ वैद्यकीय अधिकारी पदांसाठी मोठी भरती जाहीर

आवश्यक शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • १. शिक्षण सेवक (प्राथमिक – १ ली ते ५ वी): १२ वी (५०% गुणांसह) उत्तीर्ण आणि D.Ed / B.El.Ed / D.T.Ed आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण. (संबंधित माध्यमातील शिक्षण आवश्यक).

  • २. शिक्षण सेवक (उच्च प्राथमिक – ६ वी ते ८ वी): संबंधित विषयात पदवी (५०% गुणांसह) आणि B.Ed / D.Ed आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण.

  • ३. विशेष शिक्षक (चित्रकला): १० वी / १२ वी पास आणि चित्रकला / कला / रंगकला मधील सरकारमान्य पदवी/पदविका (Diploma) + ०५ वर्षांचा अनुभव. BMC Shikshan Sevak Recruitment 2026

  • ४. विशेष शिक्षक (संगीत): १० वी / १२ वी पास आणि संगीत विशारद / वाद्य / नृत्य विशारद पदवी किंवा पदविका + ०५ वर्षांचा अनुभव. (टीप: सर्व पदांसाठी MSCIT/संगणक प्रमाणपत्र आणि १० वी/१२ वी ला मराठी विषय असणे अनिवार्य आहे).

वयोमर्यादा आणि सूट (Age Limit)

  • खुला प्रवर्ग (Open Category): १८ ते ३८ वर्षे.

  • मागासवर्गीय प्रवर्ग (Reserved Category): १८ ते ४३ वर्षे.

  • वयातील सूट: शासनाच्या नियमांनुसार माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग आणि अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी वयात अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. BMC Shikshan Sevak Recruitment 2026

अर्ज शुल्क आणि नोकरीचे ठिकाण (Application Fee & Location)

  • अर्ज शुल्क (Fee): शासनाच्या पवित्र पोर्टल (Pavitra Portal) च्या नियमांनुसार.

  • नोकरीचे ठिकाण: मुंबई (बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा – BMC Schools).

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (पवित्र पोर्टलद्वारे).

📝 ही भारती सुद्धा पहा: Konkan Railway Apprentice Recruitment 2026: कोकण रेल्वेत पदवीधर आणि डिप्लोमा धारकांसाठी १३४ जागांची भरती; थेट मुलाखत!

मोबाईलवरून माहिती कशी पाहावी व ऑनलाईन अर्ज कसा करावा?

या BMC Shikshan Sevak Recruitment 2026 शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना ‘पवित्र पोर्टल’ (Pavitra Portal) द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अनेक उमेदवारांना प्रश्न पडतो की मोबाईलवरून अर्ज कसा करायचा? तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात सहज डाऊनलोड करू शकता.

मोबाईलमध्ये सर्व पात्रता अटी व्यवस्थित वाचल्यानंतर, महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. तुमचे सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, TET पास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि MSCIT मोबाईलद्वारे स्कॅन करून अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा. पवित्र पोर्टलवरील वेळापत्रकानुसार दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी आपला अर्ज नक्की सबमिट करा.

📢 एक मिनिट नक्की वाचा: अशाच प्रकारच्या शिक्षक भरती, शासकीय आणि खाजगी नोकरीच्या नवनवीन आणि खात्रीशीर अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) वेबसाईटला नेहमीच भेट द्या आणि तुमच्या बेरोजगार मित्रांसोबत नक्की शेअर करा.

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC)BMC Shikshan Sevak Recruitment 2026 शाळांमध्ये ‘शिक्षण सेवक’ म्हणून नोकरी मिळवण्याची TET उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक अत्यंत प्रतिष्ठेची आणि सुरक्षित सरकारी नोकरीची संधी आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी मोठ्या प्रमाणावर जागा असल्यामुळे पात्र उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी ‘पवित्र पोर्टल’वर आजच आपला अर्ज ऑनलाईन सबमिट करावा. सर्व भावी शिक्षकांना ‘नोकरी हक्काची’ टीमकडून हार्दिक शुभेच्छा!

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi