Ladki Bahin Yojana Fake News: नमस्कार लाडक्या बहिणींनो, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’Ladki Bahin Yojana Fake News योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी (e-KYC) मुदतवाढी संदर्भात अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. मात्र, या सर्व बातम्या पूर्णपणे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असून, सरकारने यावर अधिकृतपणे ‘Fake News Alert’ जारी केला आहे.
शासन काय म्हणते? (अधिकृत परिपत्रक) Ladki Bahin Yojana Fake News
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने सोशल मीडियावरील या अफवांची गंभीर दखल घेतली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, योजनेअंतर्गत ई-केवायसी (e-KYC) करण्याकरिता निश्चित करण्यात आलेली मुदत आता अधिकृतपणे संपलेली आहे. त्यामुळे यामध्ये कोणतीही नवीन मुदतवाढ देण्यात आलेली नाही. Ladki Bahin Yojana Fake News
📝 ही माहिती सुद्धा पहा: Why Ladki Bahin Yojana money is not credited: लाडकी बहीण योजना: तुमचा हप्ता का रखडला? पैसे बंद होण्यामागची ‘ही’ आहेत ७ मुख्य कारणे; आज सोमवारपासून पुन्हा सुरू होणार वितरण!
सोशल मीडियावरील ‘त्या’ बातम्या पूर्णपणे खोट्या!
फेसबुक, व्हॉट्सॲप आणि यूट्यूबवर काही घटकांकडून “लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला पुन्हा मुदतवाढ मिळाली” अशा स्वरूपाच्या चुकीच्या व भ्रामक बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “सदर प्रसारित होत असलेल्या बातम्या या वस्तुस्थितीला धरून नसून, त्या पूर्णपणे अफवा आहेत.” Ladki Bahin Yojana Fake News
महिलांना सरकारचे महत्त्वाचे आवाहन
महिला व बाल विकास विभागाने राज्यातील सर्व नागरिक आणि लाडक्या बहिणींना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या कोणत्याही अप्रमाणित बातम्यांवर किंवा व्हायरल मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नये. योजने संदर्भातील कोणत्याही नवीन नियमासाठी किंवा अपडेटसाठी केवळ अधिकृत स्रोतांवरून (Official Sources) मिळणाऱ्या माहितीलाच प्राधान्य द्यावे.
📝 ही माहिती सुद्धा पहा: PM Kisan Yojana 23rd Installment Date Update: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पुढच्या महिन्यात खात्यात येणार पीएम किसानचे २००० रुपये? २३ व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर
लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी मुदत आता संपली असून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही, यावर सरकारने अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. सोशल मीडियावरील व्ह्यूज आणि लाईक्ससाठी काही लोक खोट्या हेडलाईन्स पसरवत आहेत, त्यापासून महिलांनी सावध राहणे गरजेचे आहे. योजनेबाबत कोणताही नवीन निर्णय झाल्यास तो सरकारच्या अधिकृत वेबसाईट किंवा खात्यावरच प्रसिद्ध केला जाईल.