MCL Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही तांत्रिक क्षेत्रातील पदवी किंवा पदविका (Diploma) पूर्ण केली असेल आणि केंद्र सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे. ‘कोल इंडिया लिमिटेड’ची उपकंपनी असलेल्या ‘महानदी कोलफील्ड्स लिमिटेड’ (MCL) मार्फत २०२६ सालासाठी ५०० रिक्त पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
महानदी कोलफील्ड्स लिमिटेड-MCL Recruitment 2026 ही भारतातील कोळसा उत्पादनातील एक अग्रगण्य कंपनी आहे. कोळसा क्षेत्रातील कामाचा अनुभव आणि सरकारी नोकरीची सुरक्षा मिळवण्यासाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे. या भरतीअंतर्गत प्रामुख्याने असिस्टंट फोरमन आणि टेक्निशियन यांसारखी तांत्रिक पदे भरली जाणार आहेत. विशेषतः ज्या उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल क्षेत्रातील पात्रता आहे, त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.
या भरतीची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाणे दिली आहे.
📝 ही भारती सुद्धा पहा: India Post Bharti 2026: भारतीय डाक विभागात अधिकारी होण्याची संधी! असिस्टंट मॅनेजर आणि पर्यवेक्षक पदांची भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया!
भरतीचा तपशील Ditails Of MCL Recruitment 2026
-
पदाचे नाव व पदसंख्या: * असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) (E&M): १५० पदे
-
टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) (ट्रेनी) (E&M): ३५० पदे
-
-
एकूण रिक्त पदे: ५०० जागा.
शैक्षणिक पात्रता
- पद क्र. १: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स पदवी (Degree).
- पद क्र. २: (i) १० वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician) (iii) खाणींसाठीच्या आयई नियमांनुसार एलटी परवाना किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला ४४०-५५० व्होल्ट खाणकाम भागांचा परवाना. MCL Recruitment 2026
📝 ही भारती सुद्धा पहा: PGCIL Recruitment 2026: पावर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये ६६८ जागांसाठी महाभरती; पदवीधर आणि डिप्लोमा धारकांना मोठी संधी!
-
वयोमर्यादा: २८ मे २०२६ रोजी १८ ते ३० वर्षे (SC/ST उमेदवारांना ५ वर्षे तर OBC उमेदवारांना ३ वर्षे सूट).
-
नोकरीचे ठिकाण: ओडिशा.
-
परीक्षा शुल्क: * General/OBC/EWS: ₹११८०/-
-
(SC/ST/PWD/ExSM आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही).
-
-
अर्जाची पद्धत: या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे २०२६ (रात्री ११:५० वाजेपर्यंत) ही आहे.
अर्ज कसा करायचा? (How to Apply Guide)
१. सर्वात आधी MCL MCL Recruitment 2026 च्या अधिकृत वेबसाईटला किंवा खाली दिलेल्या ‘Apply Online’ लिंकला भेट द्या.
२. वेबसाईटवर दिलेल्या ‘Recruitment’ किंवा ‘Careers’ विभागात जाऊन संबंधित भरतीची जाहिरात शोधा.
३. तुमची नोंदणी (Registration) करून लॉगिन आयडी तयार करा.
४. अर्जामध्ये विचारलेली सर्व शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरा.
५. आवश्यक कागदपत्रे, जसे की शैक्षणिक प्रमाणपत्रे, आयटीआय/डिप्लोमा मार्कशीट आणि परवाना स्कॅन करून अपलोड करा.
६. अर्जाचे शुल्क भरा आणि फॉर्म फायनल सबमिट करा. MCL Recruitment 2026
📝 ही भारती सुद्धा पहा: BMC Recruitment 2026: मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! अगरवाल रुग्णालय मुलुंड येथे भरती सुरू; सविस्तर माहिती येथे पहा
मोबाईलवरून अर्ज करण्याची सुविधा
मित्रांनो, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही! तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा हा ऑनलाईन अर्ज सहज भरू शकता. फक्त अर्जाची लिंक ओपन केल्यावर ब्राउझरमध्ये ‘Desktop Site’ मोड ऑन करा, ज्यामुळे तुम्हाला सर्व ऑप्शन्स स्पष्ट दिसतील. तुम्ही घरी बसून तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने हा फॉर्म काही मिनिटांत पूर्ण करू शकता, अशी आम्ही तुम्हाला खात्री देतो.
अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी?
-
विशेषतः पद क्र. २ साठी आवश्यक असलेला ‘खाणकाम भागांचा परवाना’ तुमच्याकडे वैध असल्याची खात्री करा.
-
फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करताना ती विहित आकारात (Size) असल्याची खात्री करा.
-
शेवटच्या तारखेपर्यंत (२८ मे) वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज सादर करा.
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
-
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: [Apply Online Link]
-
अधिकृत जाहिरात PDF पहा: [Download PDF Here]
-
अधिकृत वेबसाईट: https://www.mahanadicoal.in/