Maharashtra Professor Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती प्रक्रिया आता अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष होणार आहे. राज्यपाल कार्यालयाच्या निर्देशानुसार नवीन कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून, यापुढे सर्व भरती याच पद्धतीने पार पडतील. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा राखण्यास मदत होईल.
प्राध्यापक भरती प्रक्रिया-Maharashtra Professor Bharti 2025 आता जोर पकडणार आहे. कारण आता मंत्र्यांद्वारे सरळ सूचना मिळाल्या आहेत कि हि पदभरती निवडणुकी पूर्वी पूर्ण करा. महिला अनेक दिवस पासून रखडलेली हि भरती आता जोर पकडणार असे दिसते. निश्चितच हि एक आनंदाची बाब आहे. राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलात आणण्याची प्रक्रिया वेगात सुरू झाली असली तरी या धोरणाची शिक्षकवर्गावरच अवलंबून आहे. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये अद्यापही हजारो प्राध्यापक पदे रिक्त आहेत.
Professor Recruitment : सार्वजनिक विद्यापीठांतील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेला शासनाची मान्यता, निवडीच्या ATR कार्यपद्धतीचा जीआर प्रसिद्ध | Maharashtra Professor Bharti 2025
या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व कुलगुरूंना स्पष्ट सूचना दिल्या की, लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा निवडणूक आचारसंहितेमुळे आणखी अडथळे येतील.
सार्वजनिक (अकृषि) विद्यापीठांमधील सध्या सुरू असलेल्या अध्यापक व सांविधिक पदांच्या निवड प्रक्रिया नव्या कार्यपद्धतीनुसार पूर्ण करण्यात येणार असून भविष्यात होणाऱ्या सर्व भरती प्रक्रियेसाठी याच कार्यपद्धतीचा अवलंब करणे बंधनकारक असणार आहे, असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. याबाबत चा शासन निर्णय www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. Maharashtra Professor Bharti 2025
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेला मान्यता मिळाली आहे. यापुढे भरती अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष होणार आहे. राज्यपाल कार्यालयाच्या निर्देशांनुसार नवीन कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यानुसार विद्यापीठांमधील अध्यापक आणि सांविधिक पदांच्या सर्व भरती प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. भविष्यातही याच कार्यपद्धतीचा अवलंब करणे बंधनकारक असेल.