Ladki Bahin Yojana Maharashtra: नमस्कार लाडक्या बहिणींनो, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना पुढील १५वा हप्ता म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मिळेल असे महिला व बाल विकास कल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांनी ट्विटर द्वारे सांगितले आहे. म्हणजेच पुढील २ ते ३ दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये १५०० रुपये जमा होणार आहेत.
त्याचबरोबर केंद्र सरकारने चालू केलेली प्रधानमंत्री किसान योजना – PM Kisan अंतर्गत पात्र शेतकरी बांधवांना ६ हजार रुपये वार्षिक ३ हप्त्यांमध्ये दिले जातात. या योजनेचा २१ वा हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपये जमा केले जात आहेत. परवापासून हे पैसे शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, देशातील कोट्यावधी शेतकरी प्रधानमंत्री किसान योजना – PM Kisan च्या हप्त्याची वाट पाहत आहेत. याबरोबर पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या ३ राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा प्रत्येकी २ हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. या राज्यांमध्ये नुकत्याच आलेल्या पुर आणि भूस्खलनामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी ही रक्कम वेळेआधी जमा करण्यात आली आहे. Ladki Bahin Yojana Maharashtra
Ladki Bahin Yojana Maharashtra | लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबरचे 1500 रुपये काही तासात येणार, उद्यापासून वितरण सुरु
आता अशा प्रकारची काहीशी महाराष्ट्रामधील परिस्थिती आहे. महाराष्ट्रात सुद्धा या योजनेचा आगाऊ हप्ता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जाईल अशी अपेक्षा आहे. जर या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना २ हजार रुपये मिळाले तर लाडक्या बहिणी योजनेचे- Ladki Bahin Yojana Maharashtra १५०० आणि हे २ हजार रुपये मिळून ३५०० रुपये दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत.