Anandacha Shidha Yojana: महायुती सरकारची आणखी एक योजना बंद? ‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा!

Anandacha Shidha Yojana: नमस्कार मंडळी, मा.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यात आनंदाचा शिधा योजना-Anandacha Shidha Yojana सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून सणाच्या दिवशी १ कोटी ६३ लाख लोकांना लाभ मिळत होता. या आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना १ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो चना डाळ आणि १ लिटर पामतेल मिळत होते. परंतु, राज्याच्या आर्थिक चणचणीमुळे या योजनेसाठी निधीच नसल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे अतिवृष्टी आणि पूरस्थितीने राज्यात प्रचंड मोठे नुकसान झाले असताना शेतकरी तसेच गरिबांची दिवाळी फराळाविनाच जाईल, असे चित्र असल्याचे म्हटले जात आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Ladki Bahin Yojana E-KYC OTP Problem: ई-केवायसी करायला गेलात, पण OTP काही केल्या आला नाही? जाणून घ्या नेमकी अडचण!

गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील बऱ्याच भागात अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने ६० लाख हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत. लाखो शेतकऱ्यांना अद्यापही मदत पोहोचलेली नाही. त्यामुळे दिवाळीत तरी दिलासा देण्याबाबत ‘आनंदाचा शिधा’ योजनेचा लाभ सरकारकडून देण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतु, दिवाळी दोन आठवड्यांवर आलेली असताना शासकीय पातळीवर याबाबत कोणतीही हालचाल सुरू झालेली नाही.

Anandacha Shidha Yojana : सण आले पण आनंदाचा शिधा मिळेना

२०२३ मध्ये गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी या सणांच्या निमित्ताने, तसेच २०२४ मध्ये अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सरकारने ‘आनंदाचा शिधा’-Anandacha Shidha Yojana किटचे वितरण केले होते. मात्र, यंदा राज्य सरकारकडून गणेशोत्सव आणि त्यानंतर दिवाळीत आनंदाचा शिधा वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही योजनाही बंद होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Ladki Bahin Yojana Maharashtra: अपात्र लाडक्या बहिणींना ५१०० कोटी रुपये वाटले; लाडकी बहीण' योजनेमुळे वाढली डोकेदुखी

याबद्दलची सविस्तर माहिती पहा खाली दिलेल्या व्हिडिओ मधून.

👉👉  व्हिडिओ येथे पहा. 👈👈

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi