Ladki Bahin Yojana Recovery News Maharashtra: लाडक्या बहिणींकडून ११ कोटींची वसुली सुरू! बोगस लाभार्थ्यांचे धाबे दणाणले; थेट पगारातून कापले जातायत पैसे

Ladki Bahin Yojana Recovery News Maharashtra: नमस्कार लाडक्या बहिणींनो, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या वहिनी साठी एक महत्त्वाची आणि विशेष अपडेट आली आहे. Ladki Bahin Yojana Recovery News Maharashtra योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांसाठी आता धोक्याची घंटा वाजली आहे. या योजनेत घुसखोरी करणाऱ्या हजारो अपात्र महिलांवर सरकारने आता थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आतापर्यंत चक्क ११ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असून, प्रशासनाने बोगस लाभार्थ्यांची यादीच तयार केली आहे.

​बोगस लाभार्थ्यांचा खेळ उघड | Ladki Bahin Yojana Recovery News Maharashtra

​योजनेच्या पडताळणीदरम्यान राज्यातील तब्बल १२,९१५ महिला अपात्र असल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलांनी निकषात न बसताही सरकारकडून हप्ते मिळवले होते. यापैकी ६,४५७ महिलांकडून प्रशासनाने आतापर्यंत वसुली पूर्ण केली असून, तब्बल ११ कोटी रुपये पुन्हा सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत.

​सरकारी कर्मचारी महिला रडारवर

​या कारवाईत सर्वात मोठा झटका सरकारी सेवेत असणाऱ्या महिलांना बसला आहे. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या ज्या महिला कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला होता, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे. Ladki Bahin Yojana Recovery News Maharashtra

Ration Card Mission Sudhar Maharashtra: मोठी बातमी: केंद्र सरकारचा मोठा दणका! या ३ निकषांत बसणाऱ्यांचे रेशन कार्ड होणार बंद; राज्यांकडे आली ‘ब्लॅक लिस्ट’

​पगारातून कपात

ज्या महिला कर्मचाऱ्यांचे वेतन १८ ते २१ हजार रुपयांच्या आसपास आहे, त्यांच्या पगारातून थेट वसुली केली जात आहे.

​पगारवाढ रोखणार

केवळ पैसे वसूल करून सरकार थांबणार नाही, तर अशा कर्मचाऱ्यांची एक वर्षाची वेतनवाढ (Increment) रोखण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे.

​नेमक्या कोणत्या महिलांवर होतेय कारवाई?

​प्रामुख्याने श्रीमंत वर्ग, नियमित आयकर (Income Tax) भरणारे आणि सरकारी नोकरीत असूनही लाभ Ladki Bahin Yojana Recovery News Maharashtra लाटणाऱ्या महिलांचा यामध्ये समावेश आहे. आधार लिंकिंग आणि बँक खाते पडताळणीमुळे या सर्व महिलांची माहिती समोर आली असून, आता एकाही बोगस लाभार्थ्याला सोडले जाणार नसल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

लाडकी बहीण योजनेचा निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचावा यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर झालेली ही कारवाई इतर अपात्र लाभार्थ्यांसाठी एक मोठा धडा आहे. या कारवाईमुळे योजनेत पारदर्शकता येईल आणि खऱ्या पात्र महिलांना त्यांचा हक्क विनाअडथळा मिळत राहील. जर कोणी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असेल, तर त्यांनी प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी स्वतःहून माहिती अपडेट करणे गरजेचे आहे.

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi