IDBI Bank Recruitment 2026: ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह पदांच्या १३०० जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; पदवीधरांना मोठी संधी!

IDBI Bank Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. आयडीबीआय (IDBI) बँकेने २०२६ वर्षासाठी मोठी भरती जाहीर केली असून, तब्बल १३०० रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये ‘ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर’ (JAM) आणि ‘एक्झिक्युटिव्ह’ (Sales and Operations) यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.

या IDBI Bank Recruitment 2026 भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र उमेदवारांना निश्चित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०२६ आहे.

पदांचा तपशील (Vacancy Details) IDBI Bank Recruitment 2026

एकूण १३०० जागांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.

१. ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (Junior Assistant Manager – JAM): ५०० जागा (अंदाजित)

२. एक्झिक्युटिव्ह – सेल्स अँड ऑपरेशन्स (Executive – Sales & Operations): ८०० जागा (अंदाजित)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • दोन्ही पदांसाठी: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) पूर्ण केलेली असावी.

  • कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

 जाहिरात पीडीएफ (PDF)  येथे पहा 👉
 ऑनलाइन अर्ज  येथे हा 👉

वयोमर्यादा (Age Limit)

  • किमान वय: २० वर्षे.

  • कमाल वय: २५ वर्षे.

  • (राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयात सवलत दिली जाईल – SC/ST: ५ वर्षे, OBC: ३ वर्षे).

निवड प्रक्रिया (Selection Process)

१. ऑनलाईन परीक्षा (Online Test): यामध्ये तर्कशास्त्र (Reasoning), इंग्रजी, गणित आणि जनरल अवेअरनेसवर आधारित प्रश्न विचारले जातील.

२. दस्तावेज पडताळणी: परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील.

३. वैद्यकीय चाचणी: अंतिम निवडीपूर्वी वैद्यकीय फिटनेस तपासला जाईल.

पगार आणि वेतन श्रेणी (Salary Details)

  • एक्झिक्युटिव्ह: पहिल्या वर्षी सुमारे ₹२९,००० आणि दुसऱ्या वर्षी ₹३१,००० प्रति महिना मानधन.

  • ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर: या पदासाठी बँकेच्या ग्रेड-ए नुसार आकर्षक वेतन श्रेणी आणि भत्ते दिले जातील.

अर्ज कसा करावा? (How to Apply)

१. IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाईट www.idbibank.in वर जा. IDBI Bank Recruitment 2026

. ‘Careers’ सेक्शनमध्ये ‘Current Openings’ वर क्लिक करा.

३. ऑनलाईन नोंदणी (New Registration) करा आणि आपला अर्ज भरा.

४. फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून परीक्षा शुल्क भरा.

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाईन अर्ज सुरू: ०८ मार्च २०२६.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ मार्च २०२६.

  • ऑनलाईन परीक्षा: एप्रिल/मे २०२६ (संभाव्य).

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi