SBI SCO Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक (SBI) ने २०२६ वर्षासाठी स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (AVP) आणि डेप्युटी मॅनेजर यांसारख्या उच्च पदांच्या एकूण ११६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२६ आहे.
अनुभवी व्यावसायिकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, यामध्ये निवड प्रक्रियेसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. पात्र उमेदवारांची निवड थेट शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.
पदाचा तपशील (Vacancy Details) SBI SCO Recruitment 2026
एकूण ११६ जागांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.
१. असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (IS Audit): १२ जागा (कंत्राटी)
२. डेप्युटी मॅनेजर (IS Audit): ४३ जागा (नियमित)
३. डेप्युटी मॅनेजर (CA – Internal Audit): ६१ जागा (नियमित)
| जाहिरात पीडीएफ (PDF) | येथे पहा 👉 |
| ऑनलाइन अर्ज | येथे पहा 👉 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
-
AVP & DM (IS Audit): ५०% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc (CS/IT/Electronics) किंवा BCA/MCA किंवा M.Tech/M.Sc पदवी. तसेच संबंधित क्षेत्रातील ३ ते ६ वर्षांचा अनुभव आवश्यक.
-
DM (Chartered Accountant): CA (Chartered Accountant) पदवी आणि आयसीएआय (ICAI) चे सक्रिय सदस्यत्व. किमान १ वर्षाचा बँकिंग ऑडिटमधील अनुभव. SBI SCO Recruitment 2026
वयोमर्यादा (३१ जानेवारी २०२६ पर्यंत)
-
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट: २७ ते ४५ वर्षे.
-
डेप्युटी मॅनेजर (IS Audit): २५ ते ३५ वर्षे.
-
डेप्युटी मॅनेजर (CA): २१ ते ३५ वर्षे. (SC/ST उमेदवारांना ५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ३ वर्षे सवलत).
पगार आणि वेतन श्रेणी (Salary / CTC)
-
AVP (IS Audit): वर्षाला ५० लाख रुपयांपर्यंत (CTC).
-
डेप्युटी मॅनेजर: ₹६४,८२० – ₹९३,९६० (MMGS-II स्केल) + इतर सरकारी भत्ते.
निवड प्रक्रिया (Selection Process)
-
या SBI SCO Recruitment 2026 भरतीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा देण्याची गरज नाही.
-
अर्जांच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी (Interview) बोलावले जाईल.
-
मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
अर्ज शुल्क (Application Fee)
-
General/EWS/OBC: ₹७५०/-
-
SC/ST/PwBD: शुल्क नाही.
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ मार्च २०२६.
अर्ज कसा करावा? (How to Apply)
इच्छुक उमेदवारांनी SBI च्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in/web/careers वर जाऊन ‘Current Openings’ मध्ये Advertisement No. CRPD/SCO/2025-26/27 अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करावा.
