PM Kissan Yojana News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा PM Kissan Yojana News २१ वा हप्ता आज बुधवार, १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता वितरित केला जाणार आहे. देशातील सुमारे ९ कोटींपेक्षा अधिक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचे २ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. मात्र, योजनेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज एका विशेष कार्यक्रमातून डीबीटी प्रणाली द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात हा २१ वा हप्ता हस्तांतरित करणार आहेत. सरकारने योजना अधिक पारदर्शक ठेवण्यासाठी आणि अपात्र लोकांना वगळण्यासाठी काही महत्त्वाचे नियम बंधनकारक केले आहेत ज्या शेतकऱ्यांनी अद्याप खालील प्रमुख तीन कामे पूर्ण केलेली नाहीत त्यांना हा २१ वा हप्ता मिळणार नाही.
तुम्हाला मिळणार का हा २१ वा हप्ता? ‘या’ शेतकऱ्यांचा हप्ता अडकणार
सध्या आपण पाहतो की, शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या सर्व योजनांसाठी केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. अशातच प्रधानमंत्री किसान योजनेच्या PM Kissan Yojana News पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना सुद्धा केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यासोबतच महत्त्वाचे निकष ठेवण्यात आले आहेत, ते जर तुम्ही पूर्ण करत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर ते निकष कोणते आहेत? ते आता आपण पाहूया
१. आधार लिंकिंग अपूर्ण
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी PM Kissan Yojana News बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते अजूनही आधार-सीडिंग झालेले नाही त्यांचा हप्ता खात्यात जमा होणार नाही.
२. भू-सत्यापन अपूर्ण
बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीची पडताळणी म्हणजेच लँड सीडिंग पूर्ण केलेली नाही. अशा अपूर्ण पडताळणी असलेल्या खात्यांमध्ये पैसे जमा होणार नाहीत.
३. ई-केवायसी न करणे
सरकारने अनिवार्य केलेल्या ही केवायसी ची प्रक्रिया पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना २१ व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित रहावे लागणार आहे.
शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहेच की, सरकारी यंत्रणांनी वेळोवेळी केलेल्या अहवानानुसार ज्या शेतकऱ्यांनी वरील सर्व प्रक्रिया त्वरित पूर्ण केलेल्या आहेत फक्त त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा पुढील लाभ मिळणार आहे. बाकी शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया त्वरित पूर्ण केली नाही तर त्यांना पुढच्या हप्त्यासाठी ही सर्व कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. असे आवाहन करण्यात येत आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या YouTube Channel ला सुद्धा भेट देऊ शकता.