MahaVitaran Apprentice Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), अमरावती मंडळांतर्गत-MahaVitaran Apprentice Recruitment 2026 आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महावितरणने फेब्रुवारी २०२६ च्या जाहिरातीनुसार ‘शिकाऊ उमेदवार’ (Apprentice) पदांच्या ५७ रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ मार्च २०२६ आहे.
अमरावती जिल्ह्यात सरकारी क्षेत्रात कामाचा अनुभव घेण्याची ही एक उत्तम संधी आहे. ज्या उमेदवारांनी वीजतंत्री, तारतंत्री किंवा कोपा ट्रेडमध्ये आयटीआय पूर्ण केला आहे, ते या भरतीसाठी पात्र आहेत.
पदाचा तपशील (Vacancy Details) MahaVitaran Apprentice Recruitment 2026
-
संस्थेचे नाव: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), अमरावती.
-
पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार (Apprentice)
-
एकूण रिक्त जागा: ५७ पदे
-
ट्रेडनुसार जागा: १. वीजतंत्री (Electrician) २. तारतंत्री (Lineman/Wireman) ३. कोपा (COPA)
| जाहिरात पीडीएफ (PDF) | 👉 येथे पहा 👈 |
| ऑनलाइन अर्ज | 👉 येथे पहा 👈 |
| अधिकृत वेबसाइट | 👉 येथे पहा 👈 |
शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria) MahaVitaran Apprentice Recruitment 2026
१. उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये (Electrician/Wireman/COPA) ITI उत्तीर्ण केलेला असावा. २. नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. MahaVitaran Apprentice Recruitment 2026
वयोमर्यादा (Age Limit)
-
महावितरणच्या नियमानुसार आणि शिकाऊ उमेदवार कायदा १९६१ नुसार वयोमर्यादा लागू राहील. (साधारणपणे १८ ते ३० वर्षांपर्यंत, प्रवर्गांनुसार सवलत लागू).
अर्ज प्रक्रिया (Application Process) – अत्यंत महत्त्वाचे!
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दोन टप्प्यात आहे.
टप्पा १: ऑनलाईन नोंदणी (Online Registration) १. उमेदवारांनी सर्वप्रथम www.apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
२. त्यानंतर महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करावा.
टप्पा २: कागदपत्रे जमा करणे (Offline Submission)
-
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर, अर्जाची प्रत आणि सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे (Educational Documents), आधार कार्ड यांच्या साक्षांकित प्रती दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा टपालाने पाठवणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
-
ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख: ०६ मार्च २०२६
-
कागदपत्रे सादर करण्याची शेवटची तारीख: ०९ मार्च २०२६ (संध्याकाळी ५:४५ वाजेपर्यंत).
निवड प्रक्रिया (Selection Process)
-
ही निवड १० वी आणि ITI मधील गुणांच्या टक्केवारीवर आधारित (Merit Based) असेल. कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा
MahaVitaran Amravati Apprentice Bharti 2026
Mahadiscom Amravati Recruitment 2026
ITI Apprentice Jobs in Amravati
Mahavitaran Electrician Lineman Vacancy
Mahadiscom Apprentice Online Form 2026
Amravati MSEB Bharti 2026 Apply Online