Maharashtra Board HSC Result 2026 Live Date and Time: अखेर मुहूर्त ठरला! उद्या जाहीर होणार १२ वीचा निकाल; दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर पाहता येणार रिझल्ट

Maharashtra Board HSC Result 2026 Live Date and Time: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (HSC) १२ वीच्या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी अखेरची आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला असून, बोर्डाने अधिकृतपणे निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे.

उद्या दुपारी १ वाजता निकाल ऑनलाईन!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार, दिनांक २ मे २०२६ रोजी दुपारी ०१:०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

HSC SSC Result 2026 Maharashtra Board Date Update: १० वी – १२ वीच्या निकालाचा मुहूर्त ठरला! बोर्डाकडून मोठी अपडेट; ‘या’ दिवशी जाहीर होणार निकाल?

प्रेस कॉन्फरन्समध्ये होणार घोषणा

निकाल जाहीर करण्यापूर्वी, राज्य मंडळाच्या पुणे-Maharashtra Board HSC Result 2026 Live Date and Time येथील कार्यालयात शनिवार, २ मे रोजी सकाळी ११:०० वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचा एकूण निकाल, टक्केवारी आणि इतर सांख्यिकीय माहिती शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांच्याकडून दिली जाईल. त्यानंतर दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना वैयक्तिक निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.

निकाल कुठे पाहायचा? Maharashtra Board HSC Result 2026 Live Date and Time

विद्यार्थी खालील अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहू शकतात. Maharashtra Board HSC Result 2026 Live Date and Time

१. mahresult.nic.in

२. hscresult.mkcl.org

३. hsc.mahresults.org.in

(निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला ‘रोल नंबर’ आणि ‘आईचे नाव’ प्रविष्ट करणे आवश्यक असेल.)

यंदाच्या १२ वीच्या परीक्षेला राज्यातून लाखो विद्यार्थी बसले होते. मे महिन्याच्या सुरुवातीलाच निकाल लागत असल्याने विद्यार्थ्यांना पुढील पदवी प्रवेशासाठी (Degree Admission) पुरेसा वेळ मिळणार आहे. ही अधिकृत घोषणा झाल्यामुळे आता सोशल मीडियावरील अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. सर्व १२ वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा!

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi