Ladki Bahin Yojana eligibility: नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्यातील गरजू महिलांचा सामाजिक-आर्थिक स्तर सुधारणे व त्यांना नियमित आर्थिक मदत देणे या उद्देशाने चालू करण्यात आलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सध्या वादाच्या भवऱ्यात सापडली आहे. या योजनेची अंमलबजावणी झाली त्यावेळेस जवळपास २ कोटी पेक्षा जास्त पात्र लाभार्थी महिलांना सरसकट Ladki Bahin Yojana eligibility लाभ देण्यात आला होता.
नुकतेच या योजनेची वर्षपूर्ती झाली आणि या योजनेअंतर्गत निकषांवर आधारित पुढील लाभ देण्यात येईल असे सरकारकडून सांगण्यात आले. सोबतच अनेक अपात्र लाडक्या बहिणीने सुद्धा या योजनेअंतर्गत डल्ला मारण्याचे समोर आले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेची eKYC करायचे ठरवले आहे.
लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत आता गेल्या अनेक महिन्यांपासून हप्ते उशिरा येत आहेत. अजूनही सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला नाहीये. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा होत आहे. दरम्यान, आता यावर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येत आहेत. दर महिन्याला लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधींचा निधी लागतो. यामुळे अनेक आमदारांचेही निधी थकले, असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अशातच लाडकी बहीण योजना बंद होत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता एकनाथ शिंदेंनी याबाबत माहिती दिली आहे.
एकनाथ शिंदे नक्की काय म्हणाले? (Eknath Shinde on Ladki Bahin Yojana)
खरचं ही योजना बंद होणार का? अशी भीती अनेक महिलांच्या मनात निर्माण झाली आहे.याबाबत एकनाथ शिंदेंनी सांगितले की, लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, ही योजना कायम सुरु राहणार.
लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय | Ladki Bahin Yojana eligibility
लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य सांगितले आहे. यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. अनेक महिलांनी केवायसीदेखील केले आहे. दरम्यान, काही महिलांना केवायसी करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे केवायसी होत नाहीये.