Federal Bank Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, खाजगी बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. भारतातील एक आघाडीची खाजगी बँक असलेल्या फेडरल बँक (Federal Bank) ने ‘असोसिएट ऑफिसर (Sales)’ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे बँक आपल्या विविध शाखांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ मार्च २०२६ आहे. जर तुम्ही पदवीधर असाल आणि बँकिंग क्षेत्रात तुमचे भविष्य घडवू इच्छित असाल, तर ही संधी सोडू नका. या भरतीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
पदाचा तपशील (Job Details) Federal Bank Recruitment 2026
-
पदाचे नाव: असोसिएट ऑफिसर – सेल्स (Associate Officer – Sales)
-
विभागाचे नाव: सेल्स आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट (Sales & Relationship Management)
-
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत (निवड झालेल्या उमेदवारांना बँकेच्या विविध शाखांमध्ये नियुक्त केले जाईल).
शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria)
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. Federal Bank Recruitment 2026
-
शिक्षण: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) पूर्ण केलेली असावी.
-
गुण: १० वी, १२ वी आणि पदवी या तिन्ही स्तरांवर किमान ५०% गुण असणे अनिवार्य आहे.
-
भाषा: ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करत आहात, तिथली स्थानिक भाषा (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी) अवगत असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा (Age Limit)
-
सर्वसाधारण (Open/General): कमाल २७ वर्षे (उमेदवाराचा जन्म ०१ फेब्रुवारी १९९९ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा).
-
SC/ST प्रवर्ग: कमाल ३२ वर्षे (०५ वर्षांची सूट).
पगार आणि इतर फायदे (Salary & Benefits)
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी दिली जाईल.
-
Annual CTC: ₹४.६४ लाख ते ₹६.७० लाख प्रति वर्ष (ठिकाणानुसार बदलू शकते).
-
याव्यतिरिक्त NPS, ग्रॅच्युइटी, वैद्यकीय विमा आणि सवलतीच्या दरात कर्ज यांसारखे फायदे मिळतील.
| जाहिरात पीडीएफ (PDF) | 👉 येथे पहा 👈 |
| ऑनलाइन अर्ज | 👉 येथे पहा 👈 |
| अधिकृत वेबसाइट | 👉 येथे पहा 👈 |
निवड प्रक्रिया (Selection Process)
फेडरल बँकेतील या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल.
१. ग्रुप डिस्कशन (Group Discussion – GD)
२. ऑनलाइन एप्टीट्यूड टेस्ट (Online Aptitude Test)
३. वैयक्तिक मुलाखत (Personal Interview)
अर्ज शुल्क (Application Fee)
-
General/OBC: ₹५००/- (+ GST)
-
SC/ST: ₹१२५/- (+ GST)
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०४ मार्च २०२६
अर्ज कसा करावा? Federal Bank Recruitment 2026 (How to Apply)
१. सर्वप्रथम फेडरल बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर www.federalbank.co.in जा.
२. ‘Careers’ विभागात जाऊन ‘Associate Officer (Sales)’ या लिंकवर क्लिक करा.
३. आपली सर्व माहिती अचूक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
४. परीक्षा शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा
Federal Bank Recruitment 2026
Associate Officer Sales Vacancy
Federal Bank Bharti 2026 Maharashtra
Private Bank Jobs for Graduates
Federal Bank Career Opportunities 2026
Banking Jobs in India 2026