Ladki Bahin Yojana: महायुतीच्या गेमचेंजर योजनेमुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट? लाडक्या बहिणीसाठी सरकारचे तब्बल “इतके रुपये” खर्च

नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली आहे. गेल्यावर्षी ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेली ही योजना सरकारसाठी फायद्याची ठरली. ही योजना चालू केल्यानंतर विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रकारचा विरोध योजनेसाठी सतत होत होता. सरकार वेगवेगळ्या विभागातून निधी चोरत असल्याचा सुद्धा दावा विरोधी पक्षाने केला होता. अशातच लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पुरुषांनीच चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती. मग प्रश्न पडतो की, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने आतापर्यंत किती पैसा खर्च केला. याचा नेमका आकडा पुढे आला आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Ladki Bahin Yojana New Update: "या" एका चुकीमुळे लाखो लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, काय आहे कारण समजून घ्या

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Ladki Bahin Yojana

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना राज्य सरकारसाठी आतापर्यंतची सर्वात महागडी योजना ठरली आहे. RTI मधून अलीकडेच राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत मोठा खुलासा झाला आहे. गेल्या वर्षी लाडकी बहीण योजना लागू झाल्यानंतरचा डेटा समोर आला असून या अंतर्गत आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी योजनेवरील एका वर्षाचा खर्च उघड केला आहे.

👉 लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करायची? व्हिडिओ पहा 

महिला व बाल विकास विभागाने माहिती अधिकारात सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र घाडगे यांना ही माहिती दिली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत लाभार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. एप्रिल २०२५ मध्ये सर्वाधिक सुमारे २. ४७ कोटी महिला लाभार्थी ठरल्या आहेत. मात्र जून २०२५ पर्यंत लाभार्थी आणि वितरित रकमेची संख्या सुमारे ९ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे राज्याची सुमारे ३४० कोटी ४२ लाख रुपयांची बचत झाली आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Anandacha Shidha Yojana: महायुती सरकारची आणखी एक योजना बंद? ‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा!

जुलै २०२४ ते जून २०२५ या काळात ४३ हजार ४५.०६ कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आल्याचे आरटीआयमधून समोर आले आहे. सरकारकडून काही नियमात या योजनेच्या बदल करण्यात आल्याने लाभार्थी महिलांच्या संख्येत घट झाली. सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी ३६,००० कोटी रुपयांचा निधी वाटप केला आहे.

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi