Ladki Bahin Yojana eKYC Update: लाडक्या बहिणींची वाढली चिंता! नावांमध्ये मोठा घोळ, आता ई-केवायसी कशी होणार

Ladki Bahin Yojana eKYC Update: नमस्कार लाडक्या बहिणींनो, जेव्हापासून सरकारने लाडक्या बहिणींना केवायसी करण्याचे सांगितले आहे तेव्हापासून या योजनेचा मिळणारा लाभ यामध्ये मोठा परिणाम दिसून आला आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना मागच्या जून महिन्यापासून पैसे येणे बंद झाले आहे. अशातच ई केवायसी करून सुद्धा लाभ बंद होत आहेत. सरकारने तर अंगणवाडी सेविकांमार्फत पुन्हा केवायसी करण्याचे सांगितले आहे. परंतु लाडक्या बहिणींच्या नावांमध्ये बदल असल्यामुळे आणखी समस्या उत्पन्न होत आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

लाडकी बहीण योजना | Ladki Bahin Yojana eKYC Update

राज्य सरकारकडून राबवल्या  जाणाऱ्या या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक लाभ दिला जात आहे. हा लाभ योग्य आणि पात्र महिलांनाच मिळावा यासाठी शासनाकडून ई केवायसी प्रक्रिया चालू केली. याची मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपली सुद्धा. परंतु अजूनही काही महिलांच्या केवायसी करण्यामध्ये समस्या आहेत.

पुरुषांप्रमाणेच महिलांची नावे | ई केवायसीला मुदतवाढ मिळणार?

लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेत रोशन, किरण, माही, शशी, अशा नावांचे हजारो लाभार्थी आहेत. पुरुषांप्रमाणेच यांची नावे आहेत. त्यामुळे हे पुरुष आहेत की नक्की लाडक्या बहिणी आहेत त्यांची चौकशी अंगणवाडी सेविका घरी जाऊन करत आहेत. Ladki Bahin Yojana eKYC Update त्यामुळे या प्रक्रियेला जास्त वेळ लागत आहे. सरकारला विनंती आहे की या सर्व प्रक्रियेसाठी आणखीन काही दिवसांची मुदत वाढ देण्याची गरज आहे.

बऱ्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नाही. त्यामुळे आता पुढे जानेवारी चा हप्ता येईल की नाही यामुळे लाडक्या वहिनी चिंतेत आहेत. या संदर्भातील संपूर्ण माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या YouTube Channel ला सुद्धा भेट देऊ शकता. धन्यवाद 🙏

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi