BOBCAPS Recruitment 2026: बँक ऑफ बडोदाच्या उपकंपनीमध्ये ११० जागांसाठी भरती; ‘मॅनेजर’ आणि ‘टीम लीडर’ पदांसाठी करा अर्ज!

BOBCAPS Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ची पूर्ण मालकी असलेली उपकंपनी ‘बॉब कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ (BOBCAPS) मार्फत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन ईमेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२६ आहे.

या भरतीद्वारे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आणि टीम लीडर या पदांच्या एकूण ११० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात आणि नामांकित संस्थेत काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे.

पदाचा तपशील (Vacancy Details)

एकूण ११० रिक्त जागांचे पदांनुसार वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.

१. बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर (Business Development Manager): १०० पदे.

२. टीम लीडर (Team Leader): १० पदे.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) BOBCAPS Recruitment 2026

  • बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर: कोणत्याही शाखेतील पदवी (Degree) उत्तीर्ण. फायनान्शिअल प्रॉडक्ट्स (Demat/Trading) विक्रीचा अनुभव असल्यास प्राधान्य.

  • टीम लीडर: कोणत्याही शाखेतील पदवी (Degree). संबंधित क्षेत्रात किमान २ ते ३ वर्षांचा कामाचा अनुभव आणि संघ नेतृत्व (Team Handling) करण्याचे कौशल्य आवश्यक.

 जाहिरात पीडीएफ (PDF)  येथे पहा 👉
 ऑनलाइन अर्ज  येथे पहा 👉

वयोमर्यादा (Age Limit)

  • या पदांसाठी वयोमर्यादा साधारणपणे २१ ते ३५ वर्षे दरम्यान असणे अपेक्षित आहे. (प्रवर्गानुसार सरकारी नियमानुसार सवलत लागू असेल, अधिकृत जाहिरात पहावी).

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • शॉर्टलिस्टिंग: अर्जांच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. BOBCAPS Recruitment 2026

  • मुलाखत (Personal Interview): निवडलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल आणि त्याआधारे अंतिम निवड होईल.

अर्ज कसा करावा? (How to Apply Online)

१. इच्छुक उमेदवारांनी BOBCAPS Recruitment 2026 च्या अधिकृत वेबसाईट www.bobcaps.in वरील ‘Careers’ विभागात जावे.

२. संबंधित पदाची लिंक निवडून आपला अपडेटेड बायो-डेटा (Resume) आणि आवश्यक माहिती भरावी.

३. अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात.

महत्त्वाची माहिती

  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत (प्रमुख शहरे).

  • अर्जाची पद्धत: ऑनलाईन.

  • शेवटची तारीख: मार्च/एप्रिल २०२६ (लवकरात लवकर अर्ज करणे हिताचे राहील).

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi