RRB ALP Recruitment 2026: भारतीय रेल्वेमध्ये ११,१२७ जागांसाठी ‘असिस्टंट लोको पायलट’ (ALP) पदांची भरती; आयटीआय आणि डिप्लोमा धारकांना मोठी संधी!

RRB ALP Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) वर्षातील सर्वात मोठी आनंदाची बातमी दिली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांच्या तब्बल ११,१२७ रिक्त जागा भरण्यासाठी मेगा भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया १५ मे २०२६ पासून सुरु होल. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२६ आहे. 

देशातील विविध रेल्वे झोनमध्ये RRB ALP Recruitment 2026 ही भरती होणार असून, तांत्रिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीची सविस्तर माहिती, पात्रता आणि निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

पदाचा तपशील (Vacancy Details)

  • संस्थेचे नाव: भारतीय रेल्वे (Indian Railways) – रेल्वे भरती बोर्ड (RRB).

  • पदाचे नाव: असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilot – ALP).

  • एकूण रिक्त पदे: ११,१२७ जागा.

  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत (विविध रेल्वे झोन).

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) RRB ALP Recruitment 2026

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालीलपैकी एक पात्रता असणे आवश्यक आहे.

१. ITI उत्तीर्ण: १० वी पास + संबंधित ट्रेडमध्ये ITI (फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक).

२. डिप्लोमा: संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील ३ वर्षांचा डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile).

३. इंजिनिअरिंग पदवी: संबंधित शाखेतील BE/B.Tech पदवीधारक सुद्धा पात्र आहेत.

वयोमर्यादा (Age Limit – १ जुलै २०२६ पर्यंत)

  • खुला प्रवर्ग (General): १८ ते ३० वर्षे.

  • OBC प्रवर्ग: १८ ते ३३ वर्षे (३ वर्षे सूट).

  • SC/ST प्रवर्ग: १८ ते ३५ वर्षे (५ वर्षे सूट).

निवड प्रक्रिया (Selection Process)

रेल्वे ALP भरतीसाठी उमेदवारांना खालील ५ टप्प्यांमधून जावे लागेल.

१. CBT-1 (संगणक आधारित परीक्षा): प्राथमिक चाचणी.

२. CBT-2: मुख्य लेखी परीक्षा.

३. CBAT (Psychological Test): संगणक आधारित अभियोग्यता चाचणी.

४. कागदपत्र पडताळणी (DV): प्रमाणपत्रांची तपासणी.

५. वैद्यकीय तपासणी (Medical Test): रेल्वेच्या कडक मानकांनुसार (A-1 Medical Standard).

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • जाहिरात प्रसिद्ध: मार्च २०२६. RRB ALP Recruitment 2026

  • ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत: केवळ ऑनलाईन (RRB च्या अधिकृत वेबसाईट्सवरून).

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: (अधिकृत अधिसूचनेतील तारखेनुसार तपासावी).

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi