IOCL Apprentice Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये ४०५ शिकाऊ उमेदवारांची भरती; परीक्षा नाही, थेट संधी! २६ मार्चपर्यंत करा अर्ज

IOCL Apprentice Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या ‘महारत्न’ दर्जाच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)-IOCL Apprentice Recruitment 2026 ने पश्चिम विभागासाठी (Western Region) मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे ट्रेड, टेक्निशियन आणि पदवीधर अप्रेंटिस अशा एकूण ४०५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क (Fee) आकारले जाणार नाही. पात्र उमेदवारांनी २६ मार्च २०२६ पर्यंत आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील (Vacancy Details) IOCL Apprentice Recruitment 2026

एकूण ४०५ जागांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.

१. ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice): ७५ जागा

२. टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice): १२० जागा

३. पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice): २१० जागा

 जाहिरात पीडीएफ (PDF)-01  येथे पहा 👉
 जाहिरात पीडीएफ (PDF)-02  येथे पहा 👉
 ऑनलाइन अर्ज  येथे हा 👉

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • ट्रेड अप्रेंटिस: १० वी उत्तीर्ण + ITI (Fitter/Electrician/Electronics/Machinist इ.) किंवा १२ वी उत्तीर्ण.

  • टेक्निशियन अप्रेंटिस: ५०% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Civil/Instrumentation/Electronics). [SC/ST/PWD: ४५% गुण].

  • पदवीधर अप्रेंटिस: ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (Degree). [SC/ST/PWD: ४५% गुण].

वयोमर्यादा (२८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत)

  • किमान वय: १८ वर्षे.

  • कमाल वय: २४ वर्षे.

  • (SC/ST उमेदवारांना ५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ३ वर्षे सवलत).

नोकरीचे ठिकाण (Job Location)

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव.

महत्त्वाच्या अटी आणि निवड प्रक्रिया

  • अर्ज शुल्क: कोणतीही फी नाही.

  • निवड पद्धत: उमेदवारांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार (Merit List) निवड केली जाईल.

  • प्रशिक्षण कालावधी: १२ महिने (शासकीय नियमानुसार विद्यावेतन दिले जाईल).

ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply)

१. इच्छुक उमेदवारांनी https://iocl.com/apprenticeships या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

२. अर्जापूर्वी ITI उमेदवारांनी NAPS पोर्टलवर आणि डिप्लोमा/पदवीधर उमेदवारांनी NATS पोर्टलवर नोंदणी केलेली असणे बंधनकारक आहे.

३. ‘Western Region’ निवडून आपला अर्ज अचूकपणे भरावा. IOCL Apprentice Recruitment 2026

महत्त्वाची तारीख (Important Date)

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ मार्च २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत).

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi