५ गाय-म्हैस पालनासाठी ₹८.५ लाख अनुदान! गोठा, सोलर अन् मिल्किंग मशीन मिळणार; Gai Mhaishi Palan Yojana पाहा!

Gai Mhaishi Palan Yojana: नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी, महिला बचत गट आणि पशुपालकांना स्वयंरोजगाराची मोठी संधी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाकांक्षी Gai Mhaishi Palan Yojana जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पाच दुधाळ गाई किंवा पाच म्हशींच्या खरेदीसोबतच पक्का गोठा बांधकाम, ३ किलोवॅट सोलर सिस्टिम, कडबाकुट्टी यंत्र, मिल्किंग मशीन, दूध कॅन आणि तीन वर्षांचा विमा अशा संपूर्ण साहित्यासाठी तब्बल ₹८.५१ लाखांपर्यंत सरकारी अनुदान दिले जाणार आहे.

अनुदानाचे स्वरूप आणि दोन टप्प्यांत वितरण | Gai Mhaishi Palan Yojana

या प्रकल्पाची एकूण किंमत ₹११,३५,१८० निश्चित करण्यात आली असून, प्रवर्गानुसार Gai Mhaishi Palan Yojana अंतर्गत खालीलप्रमाणे अनुदान दिले जाते:

  • अनुसूचित जाती व जमाती (SC/ST): या प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रकल्पाच्या ७५% म्हणजेच तब्बल ₹८,५१,३८५ इतके अनुदान दिले जाते.

ही माहिती सुद्धा पहा: शेतजमीन ३ वर्षे पडीक ठेवल्यास होणार सरकारी जमा! महसूलमंत्र्यांचा मोठा इशारा; Maharashtra Agricultural Land Rules पाहा!

  • सर्वसाधारण व ओबीसी (General/OBC): या प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५०% म्हणजेच ₹५,६७,५९० अनुदान मिळते.

  • दोन टप्प्यांत निधी: हे अनुदान एकदम न मिळता दोन टप्प्यांत जमा होते. पहिल्या टप्प्यात गोठा व साहित्य खरेदीनंतर ५०%, तर दुसऱ्या टप्प्यात जनावरांच्या खरेदीनंतर उर्वरित ५०% रक्कम दिली जाते.

पात्रता, आरक्षण आणि आवश्यक कागदपत्रे

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या या Gai Mhaishi Palan Yojana मध्ये अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंत), अल्पभूधारक (१ ते २ हेक्टर), वनहक्कधारक आणि महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्ये महिलांसाठी ३०% तर दिव्यांगांसाठी ५% आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे. अर्जदाराकडे स्वतःची किमान १ एकर जमीन (७/१२ उतारा) किंवा स्वतःची जमीन नसल्यास किमान ५ वर्षांचा नोंदणीकृत भाडेकरार (Rent Agreement) असणे अनिवार्य आहे; मात्र वनहक्कधारकांना जमिनीची अट लागू नाही.

तसेच लाभार्थ्याकडे पशुपालन प्रशिक्षण किंवा २ वर्षांच्या दुग्ध व्यवसायाचे अनुभव प्रमाणपत्र असावे, जे प्रत्यक्ष अनुदान घेण्यापूर्वी सादर करणे आवश्यक राहील. या योजनेसाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार असल्याने इच्छुक पशुपालकांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून Gai Mhaishi Palan Yojana चा अवश्य लाभ घ्यावा.

संदर्भासाठी उपयुक्त व्हिडिओ