SIDBI Recruitment 2026: भारतीय लघु उद्योग विकास बँकेत ६८ अधिकारी पदांची भरती! पदवीधरांना आकर्षक पगार व नोकरीची सुवर्णसंधी; सविस्तर माहिती येथे वाचा

SIDBI Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारतीय लघु उद्योग विकास बँकेमध्ये (SIDBI) ‘असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A)’ आणि ‘मॅनेजर (ग्रेड B)’ पदांच्या एकूण ६८ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात अधिकारी पदावर कायमस्वरूपी रुजू होऊन आकर्षक पगार आणि प्रतिष्ठेचे करिअर घडवू इच्छिणाऱ्या अनुभवी पदवीधर व व्यावसायिक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, ११ डिसेंबर २०२६ ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

भरतीचा संक्षिप्त तपशील | SIDBI Recruitment 2026

  • संस्थेचे नाव: भारतीय लघु उद्योग विकास बँक (Small Industries Development Bank of India – SIDBI).

  • एकूण रिक्त जागा: ६८ पदे.

  • पदांची नावे व संख्या:

    • असिस्टंट मॅनेजर – ग्रेड A (जनरल): ५३ पदे

    • असिस्टंट मॅनेजर – ग्रेड A (IT): ०५ पदे

    • असिस्टंट मॅनेजर – ग्रेड A (लीगल): ०३ पदे

    • असिस्टंट मॅनेजर – ग्रेड A (हिंदी): ०२ पदे

    • मॅनेजर – ग्रेड B (लीगल): ०३ पदे

    • मॅनेजर – ग्रेड B (हिंदी): ०१ पद

    • मॅनेजर – ग्रेड B (IT): ०१ पद

📝 ही भारती सुद्धा पहा: Talathi Recruitment 2026: महाराष्ट्र राज्य तलाठी भरती १,८४० जागांसाठी बंपर संधी! कोणत्याही शाखेच्या पदवीधरांना आकर्षक पगार; सविस्तर माहिती येथे वाचा

  • शैक्षणिक पात्रता व अनुभव:

    • असिस्टंट मॅनेजर (जनरल): ६०% गुणांसह कॉमर्स/इकॉनॉमिक्स/मॅथेमॅटिक्स/स्टॅटिस्टिक्स/बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन/इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: ५०%] किंवा CA/CS/CMA/ICWA/CFA/MBA/PGDM आणि ०२ वर्षे अनुभव.

    • असिस्टंट मॅनेजर व मॅनेजर (लीगल): ५०% गुणांसह विधी (Law) पदवी [SC/ST/PWD: ४५%] आणि पदानुसार ०२ ते ०५ वर्षे अनुभव.

    • असिस्टंट मॅनेजर व मॅनेजर (IT): ६०% गुणांसह B.E./B.Tech/MCA [SC/ST/PWD: ५५%] आणि पदानुसार ०२ ते ०४ वर्षे अनुभव.

    • असिस्टंट मॅनेजर व मॅनेजर (हिंदी): संबंधित शाखेत ६०% गुणांसह पदवी [SC/ST/PWD: ५०%] + भाषांतर पदव्युत्तर डिप्लोमा किंवा ५०% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि पदानुसार ०२ ते ०५ वर्षे अनुभव.

  • वयोमर्यादा: २१ नोव्हेंबर २०२६ रोजी,

    • ग्रेड A पदांसाठी: २१ ते ३० वर्षे.

    • ग्रेड B पदांसाठी: २५ ते ३३ वर्षे.

    • [SC/ST प्रवर्गासाठी ०५ वर्षे आणि OBC प्रवर्गासाठी ०३ वर्षे वयात सवलत लागू].

  • अर्ज शुल्क: खुला (GEN)/OBC/EWS प्रवर्ग: ₹११००/- [SC/ST/PWD उमेदवारांसाठी ₹१७५/-].

  • अर्जाची पद्धत: ऑनलाईन (Online).

  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.

महत्त्वाच्या लिंक्स आणि तारखा

देशातील आघाडीच्या वित्तीय संस्थेत (SIDBI) ग्रेड A आणि ग्रेड B अधिकारी म्हणून रुजू होऊन उच्च वेतनमान आणि सुविधा मिळवण्यासाठी SIDBI Recruitment 2026 ही एक उत्तम संधी आहे. परीक्षा २७ डिसेंबर २०२६ रोजीच होणार असल्याने, पात्र उमेदवारांनी वेळ न घालवता ११ डिसेंबरपूर्वी आपला ऑनलाईन अर्ज सबमिट करावा आणि परीक्षेच्या तयारीला लागावे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

  • Q1. SIDBI भरती २०२६ अंतर्गत एकूण किती जागा भरल्या जाणार आहेत? उत्तर: या भरतीद्वारे असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) आणि मॅनेजर (ग्रेड B) पदांच्या एकूण ६८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

  • Q2. या भरतीसाठी अर्जाची शेवटची तारीख आणि परीक्षेची तारीख कोणती आहे? उत्तर: ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ डिसेंबर २०२६ असून Phase I आणि II परीक्षा २७ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित केली जाईल.

  • Q3. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क किती आहे? उत्तर: SC, ST आणि दिव्यांग (PWD) प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क केवळ ₹१७५/- इतके आहे.

SIDBI Recruitment 2026 SIDBI Recruitment 2026 SIDBI Recruitment 2026