Ladki Bahin Yojana name change news Maharashtra 2026: नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी चर्चा योजनेच्या हप्त्यांची नसून तिच्या ‘नामांतराची’ आहे. राज्यातील राजकीय घडामोडींनुसार, या योजनेचे नाव बदलून ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
📢 ‘लाडकी बहीण’ योजनेचे नाव बदलणार? काय आहे सत्य? Ladki Bahin Yojana name change news Maharashtra 2026
अलीकडेच महाराष्ट्राचे लाडके नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि त्यांच्या समर्थकांकडून अजितदादांच्या स्मृती जपण्यासाठी विविध मागण्या केल्या जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अधिकृतपणे ही मागणी लावून धरली आहे. त्यांच्या मते, “लाडकी बहीण योजना ही अजितदादांच्या दूरदृष्टीतून आणि त्यांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळात सक्षमपणे राबवली गेली. राज्यातील महिलांमध्ये ते ‘हक्काचा भाऊ’ म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे या योजनेचे नाव ‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’ Ladki Bahin Yojana name change news Maharashtra 2026 असे करणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
अधिक माहिती येथे पहा आणि YouTube चॅनेल ला नक्की Subscribe करा 🙏
🏛️ सरकारची भूमिका काय?
या मागणीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “या संदर्भात अनेक मागण्या आमच्याकडे आल्या आहेत. आम्ही सर्व मित्रपक्ष एकत्र बसून यावर योग्य तो निर्णय घेऊ.” जरी अद्याप अधिकृत जीआर (शासन निर्णय) निघालेला नसला, तरी सरकार या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत असल्याचे दिसून येते. Ladki Bahin Yojana name change news Maharashtra 2026
💡 योजनेवर काय परिणाम होईल?
अनेक महिलांच्या मनात प्रश्न आहे की नाव बदलल्यामुळे योजनेच्या स्वरूपात बदल होईल का? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे:
-
लाभ कायम राहणार: योजनेचे नाव बदलले तरी लाभार्थी महिलांना मिळणारी आर्थिक मदत (सध्या २१०० रुपये प्रस्तावित) नियमितपणे मिळत राहील.
-
पात्रता निकष: वयोमर्यादा किंवा उत्पन्नाच्या अटींमध्ये नावबदलामुळे कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.
-
ओळख: केवळ योजनेचे ब्रँडिंग आणि अधिकृत नाव बदलले जाईल, जेणेकरून अजितदादांच्या योगदानाची आठवण जपली जाईल.