Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत ६३ रिक्त पदांची भरती; थेट मुलाखत !!

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत “शस्त्रक्रिया सहाय्यक, न्हावी, ड्रेसर, वॉर्डबॉय, दवाखाना आया, पोस्टमार्टम अटेंडन्ट, मॉच्युरी अटेंडन्ट” पदांच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26, 30 सप्टेंबर आणि 03, 04 ऑक्टोबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

Thane Mahanagarpalika Bharti 2024

  • पदाचे नाव –  शस्त्रक्रिया सहाय्यक, न्हावी, ड्रेसर, वॉर्डबॉय, दवाखाना आया, पोस्टमार्टम अटेंडन्ट, मॉच्युरी अटेंडन्ट
  • पदसंख्या – 63 जागा
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • वयोमर्यादा –70 वर्षे)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
  • मुलाखतीची तारीख –  26, 30 सप्टेंबर आणि 03, 04 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/

या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

शैक्षणिक पात्रता : Educational Qualification 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शस्त्रक्रिया सहाय्यक
  • महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेतील जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण.
  • शासन मान्यताप्राप्त संस्थेकडील ओ.टी.टेक्नॉलॉजी मधील पदविका आवश्यक.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची ओ.टी.टेक्नॉलॉजी मधली पदवी असल्यास, प्राधान्य,
  • शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या हॉस्पीटलकडील शस्त्रक्रिया सहायक अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
न्हावी
  •  महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.)
  • शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील न्हावी (बार्बर) अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
ड्रेसर
  • महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.)
  • शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील ड्रेसर अभ्यासक्रम पूर्ण व तनंतर एन.सी.टी.व्ही.टी.चे प्रमाणपत्र आवश्यक
  • शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या हॉस्पीटलकडील ड्रेसर या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वॉर्डबॉय
  • महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.)
  • शासनमान्य संस्थेकडील रुग्ण सहायक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्य
  • शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या हॉस्पीटलकडील वॉर्डबॉय या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
दवाखाना आया
  • महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.)
  • शासनमान्य संस्थेकडील रुग्णवैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्य
  • शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या हॉस्पीटलकडील दवाखाना आया या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
पोस्टमार्टम अटेंडन्ट
  • महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.)
  • पोस्ट मार्टम कामाचा एक वर्षाचा अनुभव
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
मॉच्युरी अटेंडन्ट
  • महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.)
  • पोस्ट मार्टम कामाचा एक वर्षाचा अनुभव

 

How To Apply For Thane Mahanagarpalika Bharti 2024

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 26, 30 सप्टेंबर आणि 03, 04 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment