NPCIL Apprentice Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत येणाऱ्या न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL), राजस्थान रावतभाटा साइटने २०२६ वर्षासाठी ट्रेड अप्रेंटिस पदांची मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे विविध ७ तांत्रिक ट्रेडमधील २४५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२६ आहे.
ज्या उमेदवारांनी आपले ITI शिक्षण पूर्ण केले आहे आणि जे केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित संस्थेत NPCIL Apprentice Recruitment 2026 प्रशिक्षण घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही, निवड केवळ गुणवत्तेवर (Merit Base) केली जाईल.
पदाचा तपशील (Trade-wise Vacancy Details) NPCIL Apprentice Recruitment 2026
एकूण २४५ जागांचा ट्रेडनुसार तपशील खालीलप्रमाणे आहे
-
फिटर (Fitter): ६८ जागा
-
इलेक्ट्रिशियन (Electrician): ६८ जागा
-
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (Electronics Mechanic): ६८ जागा
-
कोपा (COPA): १० जागा
-
टर्नर (Turner): १० जागा
-
मशिनिस्ट (Machinist): १० जागा
-
वेल्डर (Welder): ११ जागा
| जाहिरात पीडीएफ (PDF) | येथे पहा 👉 |
| ऑनलाइन अर्ज | येथे पहा 👉 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
-
उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण (Full-time/Regular) केलेले असावे.
-
१० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा (Age Limit – १८ मार्च २०२६ पर्यंत)
-
किमान वय: १८ वर्षे.
-
कमाल वय: २४ वर्षे.
-
(सरकारी नियमानुसार SC/ST उमेदवारांना ५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ३ वर्षे सवलत दिली जाईल).
विद्यावेतन (Monthly Stipend)
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹९,६००/- विद्यावेतन (Stipend) दिले जाईल. प्रशिक्षणाचा कालावधी १ वर्षाचा असेल.
निवड प्रक्रिया (Selection Process)
१. गुणवत्ता यादी (Merit List): उमेदवारांच्या आयटीआयमधील गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
२. कागदपत्र पडताळणी: शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावले जाईल.
३. वैद्यकीय तपासणी: अंतिम निवडीपूर्वी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक असेल.
अर्ज प्रक्रिया (How to Apply Online)
या भरतीसाठी अर्ज दोन टप्प्यात करावा लागेल. NPCIL Apprentice Recruitment 2026
टप्पा १: प्रथम (NAPS 2.0) या पोर्टलवर नोंदणी करून ‘Establishment Registration No. E08160800007‘ सर्च करून अर्ज करा.
२. टप्पा २: त्यानंतर NPCIL च्या अधिकृत करिअर वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करा.
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
-
अर्ज सुरू होण्याची तारीख: २६ फेब्रुवारी २०२६.
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १८ मार्च २०२६ (संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत).
-
नोकरीचे ठिकाण: रावतभाटा (राजस्थान) साइट.
