MSRTC Mega Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची जीवनवाहिनी असलेल्या राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) मध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानमंडळात दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळात लवकरच १७ हजार ४८२ पदांची मेगा भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. MSRTC Mega Bharti 2026
भरतीचे मुख्य आकर्षण आणि रिक्त पदे
एसटी महामंडळात MSRTC Mega Bharti 2026 सध्या चालक (Driver) आणि वाहक (Conductor) या पदांच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. यामुळे अनेक मार्गांवर बस सेवा विस्कळीत होत असल्याचे चित्र होते. ही अडचण दूर करण्यासाठी प्रामुख्याने खालील पदांची भरती होणार आहे.
-
प्रमुख पदे: चालक आणि वाहक (Driver-cum-Conductor).
-
इतर पदे: तांत्रिक कर्मचारी आणि प्रशासकीय पदे (अपेक्षित).
-
एकूण पदसंख्या: १७,४८२.
कोणाला मिळणार भरतीत प्राधान्य? MSRTC Mega Bharti 2026
परिवहन मंत्र्यांनी या भरती प्रक्रियेत एका महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे.
-
कंत्राटी कर्मचाऱ्यांची संधी: सध्या एसटी महामंडळात कंत्राटी (Contractual) पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना या नियमित भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार आहे..
-
अनुभवाचा विचार: या कर्मचाऱ्यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना निवडीमध्ये विशेष सवलत किंवा प्राधान्य देण्याबाबत शासन सकारात्मक विचार करत आहे.
पात्रता आणि अटी (अपेक्षित)
अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल, परंतु साधारण निकष खालीलप्रमाणे असू शकतात.
-
शिक्षण: १० वी/१२ वी उत्तीर्ण.
-
चालक पदासाठी: अवजड वाहन चालक परवाना (Heavy Vehicle License) आणि किमान १ वर्षाचा अनुभव.
-
शारीरिक पात्रता: उंची आणि नजरेचे निकष (जाहिरातीनुसार).
५ हजार नवीन बस खरेदीचा संकल्प
केवळ कर्मचारी भरतीच नाही, तर महामंडळाची सेवा सुधारण्यासाठी सरकारने दरवर्षी ५००० नवीन बस खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. MSRTC Mega Bharti 2026
-
यापैकी २१०० बस खरेदीसाठी टाटा मोटर्सला आधीच आदेश देण्यात आले आहेत..
-
प्रवाशांना विशेषतः महिलांना (५०% सवलत) आणि ज्येष्ठ नागरिकांना (मोफत प्रवास) अधिक चांगली सुविधा मिळावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
भरती प्रक्रिया कधी सुरू होणार?
सध्या चालक-वाहक भरतीचा हा प्रस्ताव शासनाच्या वित्त विभागाकडे (Finance Department) मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. वित्त विभागाची हिरवा कंदील मिळताच महामंडळ अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज प्रक्रिया सुरू करेल..
माहिती स्रोत:- लोकमत