MCGM Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 145 जागांसाठी भरती; ९० हजार रुपयांपर्यंत मिळणार पगार

MCGM Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) MCGM Bharti 2026 विविध विभागांमध्ये एकूण १४५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती प्रामुख्याने कूपर रुग्णालय आणि महापालिकेच्या संबंधित आरोग्य व तांत्रिक विभागांसाठी करण्यात येत असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरात शासकीय नोकरी मिळवण्याची ही उमेदवारांसाठी उत्तम संधी मानली जात आहे.

या भरती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ECG व एक्स-रे तंत्रज्ञ, इलेक्ट्रिशियन, वायरमन, लिफ्ट ऑपरेटर तसेच वॉर्ड बॉय, आया, सफाई कर्मचारी” यांसारख्या सहाय्यक पदांचा समावेश आहे. विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना या भरतीत संधी देण्यात आली असून, पदानुसार आवश्यक शिक्षण व अनुभव वेगवेगळा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ फेब्रुवारी २०२६ आहे.

🎯 पदाचे नाव – ही भरती “वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ECG व एक्स-रे तंत्रज्ञ, इलेक्ट्रिशियन, वायरमन, लिफ्ट ऑपरेटर तसेच वॉर्ड बॉय, आया, सफाई कर्मचारी” या पदांसाठी असणार आहे.

👨‍🎓 एकूण पदसंख्या – या भरतीसाठी एकूण ४५ रिक्त जागा असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी उमेदवार या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार ७वी, १०वी किंवा १२वी उत्तीर्ण, ITI/डिप्लोमा/पॅरामेडिकल कोर्स तसेच वैद्यकीय पदांसाठी MBBS किंवा समकक्ष पात्रता आवश्यक आहे.. (इतर पदांसाठी सविस्तर जाहिरात PDF पहा)

💁‍♂️ वयोमर्यादा – या भरतीसाठी उमेदवार ०१ जानेवारी २०२६ पर्यंत १८ ते ३८ वयाचा असावा. (SC/ST प्रवर्गासाठी ५ वर्ष सूट आणि OBC साठी ३ वर्ष सूट देण्यात येत आहे.)

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाइन असणार आहे.

🌎 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

📝 अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि मुलाखतीचे ठिकाण – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्णायात पहिला मजला, डी विंग (आस्थापना विभाग)

💵 अर्ज शुल्क – या भरतीसाठी ९३४ रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे.

✍ अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://portal.mcgm.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

MCGM Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026

 जाहिरात पीडीएफ (PDF)  येथे पहा 👉
ऑफलाइन अर्ज  येथे पहा 👉

How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Application 2026 | MCGM Bharti 2026

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.

अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ फेब्रुवारी २०२६ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज येथून करा

Leave a Comment