Ladki Bahini Yojana New Update: नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची वर्षपूर्ती झाल्यानंतर बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे लाभ हे तात्पुरत्या स्वरूपात किंवा काही लाडक्या बहिणीचे लाभ हे कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले आहेत. यासाठी शासनाकडून वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत.
आत्ताच काही दिवसांपूर्वी या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचा तेरावा हप्ता वितरित करण्यात आला. परंतु, यामध्ये जवळपास २६ लाख लाडक्या बहिणीच्या अर्ज अपात्र ठरविण्यात आलेले आहेत. यामध्ये मुख्य कारण सांगितले आहे की, एका घरातील एकापेक्षा जास्त लाडक्या बहिणी Ladki Bahini Yojana New Update या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे जवळपास 26 लाख लाडक्या बहिणीच्या अर्ज हे अपत्र ठरविण्यात आलेले आहेत.
🔴👉 हे सुद्धा वाचा – Ladki Bahini Yojana New Update: लाडकी बहीण योजनेचे आली नवीन अपडेट, आता या लाडक्या बहिणींचा लाभ कायमस्वरूपी बंद
आता या सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार असून, या लाडक्या बहिणींच्या अर्जा सर्व निकषांमध्ये बसत आहेत त्या लाडक्या बहिणींना पूर्ववत सर्व लाभ देण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेची सध्याची स्थिती आणि महत्त्वाचे बदल | Ladki Bahini Yojana New Update
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. नुकतेच या योजनेचा तेरावा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जवळपास २६ लाख अपात्र महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहेत. शासनाकडून आता अंगणवाडी सेविकांना मदतीला घेऊन त्या अपात्र महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे.
या लाडक्या बहिणींचे लाभ कायमस्वरूपी बंद | ladki bahin yojana maharashtra
लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती आहेच की शासनाकडून अर्जाची पुन्हा पडताळणी केली जात आहे. यामधील अर्ज बाद होण्याची मुख्य कारणे आता आपण पाहूया.
१. या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील म्हणजेच एका रेशन कार्ड वरील एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला ज्यांचे वय २१ ते ६५ वर्षे असेल. त्यांनाच लाभ दिला जाणार आहे. पडताळणी दरम्यान असे लक्षात आले आहे की, एका कुटुंबातील दोन विवाहित महिला म्हणजेच सासु-सुना किंवा जावा-जावा यांनी अर्ज केलेले आहेत त्यामुळे त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत.
🔴👉 हे सुद्धा वाचा – Ladki Bahin Yojana New Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झालेल्या महिलांना पुन्हा लाभ मिळणार? आदिती ताई तटकरे स्पष्टच बोलल्या
२. या योजनेअंतर्गत अर्ज करताना वयाची मर्यादा दिली होती. यामध्ये २१ ते ६५ वर्ष वयाच्या सर्व महिला पात्र असणार आहेत. परंतु ज्या महिला २१ वर्ष पूर्ण नाहीत किंवा ६५ वर्ष वय होऊन गेले त्या महिलांचे लाभ बंद करण्यात आलेले आहेत.
३. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पडताळणीमध्ये असे सुद्धा लक्षात आलेले आहे की, महिलांच्या नावे तब्बल १४ हजार पुरुषांनी या योजनेअंतर्गत लाभ घेतला होता. ते सर्व अर्ज बाद करण्यात आलेले आहेत.
४. शासनाकडून केलेल्या पडताळणी दरम्यान ज्या लाडक्या बहिणीच्या अर्ज बाद करण्यात आलेले आहेत त्यांची पुन्हा पडताळणी झाल्यानंतर जे अर्ज पात्र होणार आहेत त्या सर्व लाभार्थी महिलांना तात्पुरत्या स्वरूपात थांबवलेले सर लाभ देण्यात येणार आहेत.