Ladki Bahin Yojana October Installment Date: नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पत्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत १५ हप्ते देण्यात आले आहेत. मागील सप्टेंबर महिन्याचा १५वा हप्ता १० ऑक्टोबर रोजी वितरित करण्यात आला होता. परंतु दिवाळी संपून गेली तरीसुद्धा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला नव्हता. त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी चिंतेत होत्या. अशातच राज्य सरकारकडून ऑक्टोबर महिन्याच्या १६व्या हप्ता संबंधी शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. त्यासंबंधी संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया.
लडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर च्या हप्त्यासंबंधी जीआर आला | Ladki Bahin Yojana October Installment DateLadki Bahin Yojana October Installment Date
लाडकी बहिणी योजनेचा १६ वा हप्ता वितरित करण्यासंबंधी शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी” सन २०२५-२६ च्या आर्थिक वर्षांमध्ये नीधी वितरण करण्यासंबंधीचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे.
वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेसाठी पात्र लाभार्थी महिलांना माहे ऑक्टोबर २०२५ या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी रु.४१०.३० कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यासाठी मान्यता प्रदान करण्यात येत आहे.Ladki Bahin Yojana October Installment Date
👉 अधिकृत शासन निर्णय येथे पहा 👈
ऑक्टोबर महिन्याचा १६वा हप्ता कधी जमा होणार
लाडक्या बहिणींनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की राज्य सरकारचा हा शासन निर्णय २९ ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे. म्हणजेच मागच्या हप्त्याचा विचार करता, यावेळेस पुढच्या ४ ते ५ दिवसांमध्ये सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर पैसे वितरित करण्यास सुरुवात होऊ शकते.
अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी.. यूट्यूब चैनल ला सुद्धा भेट देऊ शकता आणि संपूर्ण माहितीची व्हिडिओ खाली दिली आहे ती नक्की पहा.