Ladki Bahin Yojana March Installment Date: नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एप्रिल महिन्याची सुरुवात एका महत्त्वाच्या प्रश्नाने झाली आहे – “मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार?” फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये मार्चच्या शेवटच्या आठवड्यात खात्यात जमा झाले, मात्र मार्चचा हप्ता अद्याप प्रलंबित आहे. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
मार्चचा हप्ता का रखडला? [Why is March Installment Pending?]
मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने शासकीय स्तरावर निधीचे नियोजन आणि तांत्रिक पडताळणीची प्रक्रिया सुरू होती. तसेच, ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. ज्या महिलांनी आपली केवायसी वेळेत पूर्ण केली आहे, त्यांच्याच खात्यात आता पुढचे पैसे जमा होणार आहेत.
कधी मिळणार मार्चचे पैसे? (Expected Date)
मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याचा हप्ता १५ एप्रिल २०२६ पूर्वी महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. सरकारने नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच हा निधी वितरित करण्याचे नियोजन केले आहे.
३००० की ४५०० रुपये? कोणाला किती लाभ मिळणार? [Who will get 3000 or 4500 Rs?]
यावेळी महिलांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होऊ शकते
ज्यांना फेब्रुवारीचे पैसे मिळाले आहेत, त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्रित मिळून ३००० रुपये मिळण्याची शक्यता आहे. Ladki Bahin Yojana March Installment Date
४५०० रुपये मिळणार?
ज्या महिलांचे मागील हप्ते तांत्रिक कारणांमुळे रखडले होते आणि त्यांनी ३१ मार्चपर्यंत आपली ई-केवायसी दुरुस्त केली आहे, त्यांना फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असे तीन महिन्यांचे एकत्रित ४५०० रुपये मिळू शकतात.
आधीक माहिती साठी आमच्या YouTube Channel ला भेट द्या
ई-केवायसी मुदतवाढ | Ladki Bahin Yojana March Installment Date
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवकाळी पाऊस आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेता ई-केवायसी करण्याची मुदत आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांचे काम राहिले आहे, त्यांनी घाबरून न जाता आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. Ladki Bahin Yojana March Installment Date
तुमचा स्टेटस कसा तपासावा?
१. नारीशक्ती दूत ॲप: आपल्या अर्जाचा स्टेटस ‘Approved‘ आहे का ते तपासा.
२. बँक खाते तपासा: तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक (Aadhaar Seeded) असल्याची खात्री करा.
३. डीबीटी (DBT) स्टेटस: जर तुमचे डीबीटी बंद असेल, तर हप्ता जमा होणार नाही, त्यामुळे बँकेत जाऊन ते सुरू करून घ्या.
मार्चच्या हप्त्यासाठी आता फक्त काही दिवसांची प्रतीक्षा उरली आहे. १५ एप्रिलपर्यंत आपल्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.