Ladki Bahin Yojana January Installment Date 2026: महाराष्ट्र शासनाची अत्यंत लोकप्रिय असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील करोडो महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. सध्या अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे की, जानेवारी महिन्याचा म्हणजेच १९ वा हप्ता-Ladki Bahin Yojana January Installment Date 2026 नेमका कधी आणि कोणाला मिळणार? नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, या हप्त्याच्या वितरणाबाबत काही महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत.
हप्ता वितरणाची संभाव्य तारीख | Ladki Bahin Yojana January Installment Date 2026
सध्याच्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी रोजी रविवार असल्यामुळे बँकांना सुट्टी होती, परिणामी हप्त्याचे वितरण होऊ शकले नाही. परंतु, १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी या हप्त्याचे वितरण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. शासनाकडून लवकरात लवकर हे पैसे महिलांच्या खात्यात जमा व्हावेत, अशी मागणी लाभार्थी महिलांकडून होत आहे.
जानेवारीचा हप्ता कोणाला मिळणार? Ladki Bahin Yojana January Installment Date 2026
यावेळेसचा १९ वा हप्ता कोणत्या महिलांना मिळेल, याबाबत काही निकष महत्त्वाचे आहेत.
१. ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे
ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यशस्वीरित्या प्राप्त झाला आहे, त्यांना जानेवारीचा हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. डिसेंबरचा हप्ता मिळणे याचा अर्थ असा आहे की, तुमची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.
२. ई-केवायसी पूर्ण असलेल्या महिला
डिसेंबर महिन्यापासून सरकारने केवायसी बंधनकारक केली होती. ज्यांची केवायसी यशस्वी झाली आहे, त्यांनाच पुढील लाभ मिळणार आहे. जर तुम्ही यापूर्वी केवायसी केली असेल, तर पुन्हा पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही.
३. डीबीटी (DBT) सक्रिय केलेल्या महिला
अनेक महिलांना बँक खात्याशी आधार लिंक नसल्यामुळे किंवा डीबीटी इनॅक्टिव्ह असल्यामुळे डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता. परंतु, ज्या महिलांनी गेल्या १०-१५ दिवसांत आपली डीबीटी प्रक्रिया पूर्ण करून बँक खाते सक्रिय केले आहे, त्यांना या महिन्यात थकीत हप्त्यासह जानेवारीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
बँक खाते बदलणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची सूचना
महिलांनी विनाकारण आपले बँक खाते बदलू नये. अनेकदा बँक खाते बदलल्यामुळे किंवा नवीन खाते जोडल्यामुळे डीबीटी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येतात आणि हप्ता मिळण्यास विलंब होतो. जर तुम्हाला नियमितपणे एका खात्यात पैसे येत असतील, तर तेच खाते चालू ठेवणे हिताचे ठरेल.
केवायसी दुरुस्ती आणि प्रलंबित हप्ते
ज्या महिलांची केवायसी चुकली होती आणि त्यांनी आता ती दुरुस्त करून घेतली आहे, अशा महिलांनाही या १९ व्या हप्त्याचा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. केवायसी दुरुस्तीच्या प्रक्रियेमुळेच हप्ता वितरणास काहीसा विलंब झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे