Ladki Bahin Yojana February Installment Date 2026: नमस्कार लाडक्या बहिणींनो, काल गुढीपाडव्याचा सण साजरा झाला, गोडधोड झाले, पण लाडक्या बहिणींच्या खात्यात अपेक्षित असलेली ‘ओवाळणी’ मात्र जमा झाली नाही. आज २० मार्च आहे आणि हा दिवस या योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी अत्यंत ‘निर्णायक’ ठरणार आहे. जर आज संध्याकाळपर्यंत सरकारने ठोस पाऊल उचलले नाही, तर लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा लांबणीवर टाकले जाण्याची दाट शक्यता आहे.
नेमकं आज काय घडणार आहे? आणि २१-२२ मार्चच्या सुट्ट्यांचा या हप्त्यावर काय परिणाम होणार? हे समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत वाचणे तुमच्यासाठी गरजेचे आहे.
१. आजचा शुक्रवार का आहे ‘करो या मरो’?
सरकारी कामकाजाच्या दृष्टीने आजचा शुक्रवार (२० मार्च) हा या आठवड्यातील शेवटचा महत्त्वाचा दिवस आहे. उद्या २१ मार्चला रमजान ईदची सार्वजनिक सुट्टी आहे आणि परवा २२ मार्चला रविवार आहे. म्हणजे बँका आणि सरकारी कार्यालये सलग दोन दिवस बंद राहणार आहेत. जर आज प्रशासनाने हप्ता वितरणाचा ‘जीआर’ (GR) काढला किंवा डीबीटी प्रक्रिया सुरू केली नाही, तर हा हप्ता थेट पुढच्या आठवड्यात म्हणजे २५ मार्चच्या आसपास ढकलला जाईल.
२. दोन महिने आणि ३००० रुपये?
सध्या मंत्रालयातील सूत्रांकडून अशी कुणकुण लागली आहे की, फेब्रुवारीचा Ladki Bahin Yojana February Installment Date 2026 हप्ता आधीच खूप उशिरा झाला आहे. आता मार्च महिनाही संपत आला आहे. अशा परिस्थितीत सरकार फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित ३००० रुपये देण्याचा विचार करत आहे का?. जर आज एखादा मोठा निर्णय झाला, तर लाडक्या बहिणींना दुप्पट आनंद मिळू शकतो. पण त्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.
अधिक माहिती येथे पहा >>>>>
३. डीबीटी (DBT) लिंक नसेल तर आजच सावधान! Ladki Bahin Yojana February Installment Date 2026
अनेक महिला तक्रार करत आहेत की शेजारच्या बहिणीला पैसे मिळाले पण आम्हाला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याचे आधार लिंकिंग (DBT) फेल असणे. जर आज सरकारने पैसे पाठवले आणि तुमचे खाते लिंक नसेल, तर तुमचे पैसे पुन्हा एकदा सरकारी तिजोरीत परत जातील. त्यामुळे आजच आपल्या बँकेत जाऊन ‘डीबीटी स्टेटस’ तपासा. Ladki Bahin Yojana February Installment Date 2026
४. मंत्र्यांकडून अपेक्षा आणि ‘वेटिंग लिस्ट’
महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी यापूर्वी अनेकदा महिला दिनाचे आणि सणांचे औचित्य साधून हप्ते दिले आहेत. मात्र, गुढीपाडव्याला खंड पडल्याने आता सर्व मदार आजच्या दिवसावर आहे. आज दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत जर शासनाने बटण दाबले, तरच शनिवार-रविवारच्या सुट्टीत तुमच्या मोबाईलवर ‘क्रेडीट’चा मेसेज दिसू शकतो.
बहिणींनो, आजचा दिवस हा तुमच्या संयमाची परीक्षा पाहणारा आहे. जर आज काहीच हालचाल झाली नाही, तर मात्र हा हप्ता मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लांबणीवर पडणार हे निश्चित. आम्ही पल-पलची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.