Ladki Bahin Yojana EKYC: नमस्कार मंडळी, वंचित घटकातील महिलांना तसेच ज्यांचे आर्थिक उत्पन्न खूपच कमी आहे अशा महिलांना शासनाने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. मात्र ही योजना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी बंधनकारक आहे. यासाठी लाडक्या बहिनींची धडपड सुरू असताना आता ई-केवायसी करताना पती अथवा वडिलांचे आधार कार्ड जोडण्याची नवीन अट काहींना जाचक ठरत आहे. परंतु ज्या महिलांचे वडील वारले आहेत व पती हयात नाही किंवा घटस्फोट झाला आहे, अशा महिलांची अधिकच अडचण झाली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेला कायमचे मुकावे लागणार की काय, अशी भीती सतावत आहे. Ladki Bahin Yojana EKYC
💯 लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी..! ऑक्टोबर महिन्याचा १६वा हप्ता कधी येणार आत्ताच पहा
‘लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसीमध्ये Ladki Bahin Yojana EKYC तांत्रिक अडचणी आणि पती-वडिलांच्या आधारकार्डच्या आवश्यकतेमुळे महिलांना त्रास होत आहे, परंतु शासनाने ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत अशा महिलांचे लाभ सध्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या महिलांसाठी लवकरच नवीन उपाययोजना केली जाईल. तात्काळ योजनेचा लाभ सुरू ठेवला जाईल.
शासकीय योजनेच्या या लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याची सविस्तर माहिती, पती अथवा वडिलांचे आधार कार्ड क्रमांक नोंदवावे लागणार आहे.
👉👉 ज्या महिलांचे वडील आणि पती नाहीत अशा महिलांची ही केवायसी कशी होणार व्हिडिओ पहा 👈👈
Ladki Bahin Yojana EKYC : ई-केवायसी होत नसल्याने लाडक्या बहिणी अडचणीत
तरच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. बोगस लाभार्थी ओळखण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी योजना सुरू करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत अनेकदा वेगवेगळे बदल करण्यात येत असल्यामुळे तसेच प्रत्येक वेळी निकषा मध्ये बदल करण्यात येत असल्याने लाभार्थी महिला अडचणीत आल्या आहेत. सारख्या बदलत राहणाऱ्या निकषामुळे महिला वर्गामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.