Ladki Bahin Yojana E-KYC OTP Problem: नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र मध्ये महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने‘ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे १६ हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. पण, आता सरकारने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या संदर्भात महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. पण, ही प्रक्रिया सुरू होताच महिलांसमोर एक मोठी समस्या उभी राहिली आहे. Ladki Bahin Yojana E-KYC OTP Problem
ओटीपी न येण्यामुळे ई-केवायसीमध्ये अडचण अनेक महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. सर्वात मोठी अडचण म्हणजे, आधार क्रमांक टाकल्यानंतर आवश्यक असलेला ओटीपी (OTP) येत नाहीये. यामुळे लाखो महिला ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकत नाहीत. ही एक तांत्रिक समस्या आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची नम्र विनंती केली आहे. पण, पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे या मुदतीत ई-केवायसी पूर्ण करणे महिलांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे.
ही समस्या तातडीने सोडवणे आवश्यक आहे, जेणेकरून योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना नियमितपने मिळत राहील. सरकार आणि संबंधित विभागाने या तांत्रिक अडचणीकडे लक्ष देऊन ती लवकर दूर करावी, अशी अपेक्षा आहे.
Ladki Bahin Yojana E-KYC OTP Problem: यावर उपाय काय?
आधार केंद्रावर जाऊन संबंधित व्यक्तीचा (पती/वडील) मोबाईल नंबर अपडेट करणे.
पोर्टलवरील तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी शासनाने तातडीने लक्ष घालणे.
महिलांना मदत करण्यासाठी हेल्पलाइन नंबर किंवा सुविधा केंद्रांवर सहाय्यक उपलब्ध करून देणे.
यासंबंधी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हिडिओ नक्की पहा.. 👇👇