Ladki Bahin Yojana: नमस्कार लाडक्या बहिणीने, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाही. दरम्यान तुम्ही केवायसी केली तरीही तुमचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेत Ladki Bahin Yojana महिलांना केवायसी करण्याचे आवाहन राज्यस रकारने केले आहे. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या १५ दिवसात महिलांना केवायसी करायचे आहे. जर केवायसी केले नाही तर योजनेचा लाभ कायमचा बंद होईल.
याआधी ही तारीख १८ नोव्हेंबर होती. अजूनही लाखो महिलांची केवायसी झाले नाही त्यामुळे ही मुदत वाढवून देण्यात आली आहे.
केवायसीतील ही चूक पडू शकते महागात : Ladki Bahin Yojana
लाडक्या बहिणींना केवायसी करतानाही विशेष काळजी घ्या. जर तुम्ही आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर चुकीचा टाकला असेल तर ओटीपी दुसऱ्याच क्रमांकावर जाईल. त्यामुळे महिलांना अडचणी येऊ शकतात. याचसोबत ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाहीत त्या महिलांनी संबंधित कागदपत्रे ही महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहेत. जर तुम्ही कागदपत्र जमा केले नाही तर तुमची केवायसी पूर्ण होणार नाही. परिणामी तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसी पडताळणीत Ladki Bahin Yojana अपात्र असूनही ज्या महिलांनी लाभ घेतला त्यांची नावे समोर येणार आहेत. त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. व त्यानंतर त्यांना मिळणारा लाभ सुद्धा बंद केला जाणार आहे.
यासंबंधीच्या सर्व माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आता तुम्ही आमच्या YouTube Channel ला सुद्धा भेट देऊ शकता