Ladki Bahin Yojana 14th Installment Date: नमस्कार लाडक्या बहिणींनो, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी” योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये बँक खात्यावर थेट हस्तांतरित करण्यात येत आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत १३ वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. आता चालू महिन्याचा म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा १४ वा हप्ता कधी येईल? Ladki Bahin Yojana 14th Installment Date याची लाडक्या बहिणीने प्रतीक्षा लागून राहिली आहे.
तर, लाडक्या बहिणींनो आपल्याला माहिती आहेच की, थोड्याच दिवसांवर गणपती उत्सव आलेला आहे, आणि गणेशोत्सवातदेखील लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले जाऊ शकतात. अनेकदा सणांचा मूहूर्त साधत लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळातदेखील पैसे दिले जाऊ शकतात. दरम्यान, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. जुलै महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला होता. यावेळी ऑगस्ट महिन्यात जुलैचा हप्ता दिला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातदेखील असंच होणार का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे.
या महिलांना मिळणार नाहीत १५०० रुपये | Ladki Bahin Yojana 14th Installment Date
लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद केले आहेत. त्या महिलांना इथून पुढे कधीही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेतून ४२ लाख महिलांचे अर्ज बाद केले असल्याचे समजत आहे. दरम्यान, यानंतरही अनेकांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहे. त्यात ज्या महिला निकषांमध्ये बसणार नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. Ladki Bahin Yojana 14th Installment Date