Ladki Bahin New Update: नमस्कार लाडक्या बहिणींनो, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण-Ladki Bahin New Update” योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना आपली इ केवायसी करणे शासनाकडून अनिवार्य करण्यात आलेले आहे. या अंतर्गत बऱ्याचशा महिलांनी आपली ई केवायसी पूर्ण केलेली आहे. अजूनही बऱ्याचश्या महिलांची ई केवायसी करणे बाकी आहे. अशातच एक बातमी सोशल मीडियावर पसरत आहे की, प्राथमिक छाननी मध्ये ५२ लाख महिला अपात्र ठरवण्यात आलेलल्या आहेत. तर खरंच ही माहिती खरी आहे का? यावर आदितीताई तटकरे यांनी उत्तर दिले आहे. त्या काय म्हणाल्या सविस्तर माहिती जाणून घेऊया.
लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहिती आहेच की, लाडकी बहिणी योजनेमध्ये सुलभता आणि पारदर्शकता येण्यासाठी शासनाकडून ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये अनेक पुरुष या योजनेचा लाभ घेत आहेत असे आढळून आले होते.
Ladki Bahin New Update: अदितीताई तटकरे यांनी स्वतः दिली माहिती
त्याचबरोबर या योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत असे निदर्शनास आले आहे. अशातच सोशल मीडिया वर एक बातमी पसरत आहे, Ladki Bahin New Update ती म्हणजे ई केवायसी च्या प्रथम छाननी मध्ये ५२ लाख महिला अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. तर ही माहिती खरी आहे का? तर सोशल मीडिया वर पसरत असलेली ही माहिती पूर्णपणे खोटी आहे. याचे स्पष्टीकरण महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती ताई तटकरे यांनी दिलेले आहे.
त्या म्हणाल्या, काही प्रसार माध्यमांवर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण-Ladki Bahin New Update” योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. “प्राथमिक छाननीत ५२ लाख लाभार्थी महिला अपात्र” अशा मथळ्याखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत.
या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी e-Kyc प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
योजने संदर्भात विविध प्रसार माध्यमांतून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर / शासन निर्णयाच्या माध्यमातून / अधिकृत प्रसारमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.
e-Kyc ची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मुदतीत सर्व लाभार्थी भगिनींनी e-Kyc प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही नम्र विनंती.
याचाच अर्थ सोशल मीडिया वर पसरणाऱ्या सर्व बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. याबद्दलची अधिकृत माहिती खाली लिंक मध्ये दिलेली आहे तुम्ही इथे अधिकृत माहिती पाहू शकता.