Ladki Bahin Mobile Number Check: नमस्कार लाडक्या बहिणींनो, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची” ई-केवायसी सुरू झालेली आहे. तर ई केवायसी करताना तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. ही ई केवायसी करताना दोन Otp येतात. पहिला योजनेचा फॉर्म भरणाऱ्या लाभार्थ्याचा आणि दुसरा ओटीपी तुमच्या पतीचा किंवा वडिलांच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबरचा येतो. तर आपल्या आधार कार्ड ला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे बऱ्याचदा आपल्याला माहिती नसते तर ते कसे तपासायचे? यासंबंधी संपूर्ण माहिती आपण आता घेऊया. Ladki Bahin Mobile Number Check
लाडक्या बहिणींनो, आपल्या खात्याची ई केवायसी करताना आपल्याला २ otp देणे गरजेचे आहे. एक स्वतः अर्जदाराचा आणि दुसरा वडिलांचा किंवा पतीचा. दोघांच्याही आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ते ओटीपी येणार आहेत. तर त्या दोन्ही आधार कार्ड ला कोण-कोणते मोबाईल नंबर रजिस्टर आहेत ते कसे तपासायचे ते आता आपण पाहूया.
ladki bahin yojana kyc check | Ladki Bahin Mobile Number Check
१. सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड ची ही वेबसाईट my aadhar ओपन करायची आहे.
२. इथे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन देतील त्यामधील Check Aadhar Validity हा पर्याय निवडायचा आहे.
३. आता इथे तुमचा आधार क्रमांक आणि खाली दिलेला Captcha कोड टाकून Proceed या बटनावर क्लिक करायचे आहे.
४. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर तुमची संपूर्ण माहिती दिलेली असेल. इथे मोबाईल नंबर चे शेवटचे तीन अंक दिलेले असतात. त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तुमच्या आधार कार्ड ला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे. Ladki Bahin Mobile Number Check
५. अशाप्रकारे तुम्ही दोन्ही आधार कार्ड वर कोणते मोबाईल नंबर लिंक आहे ते सोप्या पद्धतीने पाहू शकता.
यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता.