Ladki Bahin Maharashtra gov in KYC: नमस्कार लाडक्या बहिणींना, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना १५०० रुपयांचे आतापर्यंत १६ हप्ते देण्यात आले आहेत. १७ वा हप्ता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. अशातच लाडकी बहिणी योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आपल्या खात्याची ई-केवायसी करण्याची अट शासनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढील हप्ता येणार की नाही? याची काळजी लागून राहिली आहे. अपात्र लाडक्या बहिणींना पुढील एकही हप्ता येणार नाही. यासंबंधी संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया.
या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ |Ladki Bahin Maharashtra gov in KYC
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहे. या निकषांचे पालन करणाऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलांचे वय २१ ते ६५ वयोगटातील असावे. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. महिलांकडे चारचाकी वाहन नसावे. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. Ladki Bahin Maharashtra gov in KYC
ई केवायसी न करणाऱ्या महिलांचा लाभ कायमचा बंद (Ladki Bahin Yojana KYC Mandatory)
या निकषांसोबतच आता महिलांना ई केवायसी करण्यास सांगितले आहे. ज्या महिला केवायसी करणार नाही त्यांचा लाभ बंद होणार आहे. केवायसी करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत तुम्हाला केवायसी पूर्ण करायचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला १५०० रुपये मिळणार नाहीत. फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशातून केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे. अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन ही पडताळणी करत आहेत. दरम्यान, यातून जवळपास ४० लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामुळे लाखो महिलांचे लाभ याआधीच बंद झाले आहे. यानंतर केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनेक महिलांचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे.