HSRP Number Plate Penalty 2026: नमस्कार मित्रांनो, वाहनचालकांसाठी ही धोक्याची घंटा आहे! जर तुम्ही अजूनही तुमच्या गाडीला HSRP (High-Security Registration Plate) बसवली नसेल, तर आता तुमच्या खिशाला मोठा कात्री लागणार आहे. रविवारपासून अशा वाहनधारकांवर कडक कारवाई करत दररोज १००० रुपयांचा दंड आकारला जाण्याची शक्यता आहे.
जर तुम्ही विचार करत असाल की, नंबर प्लेट नंतर बसवू, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रस्ते सुरक्षा आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारने सर्व वाहनांना ‘हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) अनिवार्य केली होती. याची मुदत संपली असून, आता रविवारपासून ट्रॅफिक पोलीस आणि आरटीओ (RTO) कडून मोठ्या मोहिमेला सुरुवात होत आहे. ज्या वाहनांवर जुन्या पद्धतीच्या किंवा फॅन्सी नंबर प्लेट्स आढळतील, त्यांना दररोज १००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
या संदर्भातील संपूर्ण माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या YouTube Channel ला सुद्धा भेट देऊ शकता. धन्यवाद
नेमकी काय आहे ही नवीन कारवाई? HSRP Number Plate Penalty 2026
सरकारने वारंवार मुदतवाढ देऊनही अनेक वाहनधारकांनी अद्याप एचएसआरपी (HSRP) प्लेट बसवलेली नाही. आता प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. HSRP Number Plate Penalty 2026
-
दंड: पहिल्यांदा पकडले गेल्यास १००० रुपये दंड आणि त्यानंतरही प्लेट न बदलल्यास हा दंड वाढत जाऊ शकतो.
-
ऑनलाईन ट्रॅकिंग: सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने आता आपोआप ई-चलन फाडले जाईल.
-
कागदपत्रे जप्ती: काही प्रकरणांत वाहनाचे आरसी बुक (RC Book) देखील निलंबित केले जाऊ शकते.
HSRP प्लेट असण्याचे फायदे काय?
चोरीला आळा: ही प्लेट एकदा बसवली की सहजासहजी काढता येत नाही, ज्यामुळे गाड्यांची चोरी कमी होते.
२. एकसमानता: सर्व गाड्यांच्या नंबर प्लेट्स एकाच फॉन्ट आणि आकारात असतात, ज्यामुळे ओळखणे सोपे जाते.
३. डिजिटल रेकॉर्ड: या प्लेटवर एक युनिक लेझर कोड असतो जो थेट आरटीओच्या सर्व्हरशी जोडलेला असतो.