HSRP Number Plate News Marathi: नमस्कार मंडळी, जुन्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी’ (एचएसआरपी) बसवण्यासाठी धावपळ करणाऱ्या वाहनधारकांना राज्य सरकारने आता शेवटची मुदत दिली आहे. १ एप्रिल, २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवण्याची प्रक्रिया ३० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करता येणार आहे.
महाराष्ट्रात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या अंतिम मुदतीनंतर HSRP नसलेल्या वाहनांवर दंड आकारला जाईल आणि १ डिसेंबर २०२५ पासून कारवाई सुरू होईल.
‘HSRP’ नंबरप्लेट नंबर नसल्यास होणार ‘इतका’ दंड! पहिल्यांदा १००० रुपये, त्यानंतर प्रत्येकवेळी १५०० रुपये दंड | HSRP Number Plate News Marathi
आत्तापर्यंत केवळ पावणे ८ लाख चालकांनी एचएसआरपी नंबरप्लेटसाठी नोंदणी केली असून, त्यातल्या साडेपाच लाख वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवून घेतली आहे. त्यामुळे नंबरप्लेट बसवून घेण्याचा वेग कमी असून, अजूनही १९ लाख वाहनांनी नोंदणी अर्ज दाखल करणे बाकी आहे.
तसेच ज्यांना नंबरप्लेट बसविण्याची तारीख दिली, तिही सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंतची आहे. त्यामुळे एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याला मुदतवाढ मिळावी याबाबत सर्व स्तरांतून मागणी होत होती. त्यानुसार गुरुवारी परिवहन विभागाने चाैथ्यांदा पुन्हा दि. ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
👇👇👇